टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत दुर्लक्षित गोल्फ कोर्सकडे नजरा वळवण्यास भाग पाडणाऱ्या भारतीय गोल्फर अदिती अशोकचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केलं आहे. गोल्फमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अदिती अशोकनं वर्ल्ड क्लास गोल्फरला चांगली टक्कर देत पदकाच्या आशा पल्लवित केल्या होत्या. मात्र अखेरच्या क्षणात थोडक्यात तिची पदकाची संधी हुकली. तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले असले तरी लक्षवेधी कामगिरीनं तिनं भारतीयांची मनं जिंकली आहेत. चौथ्या फेरीत तिने अंडर 68 स्कोअरसह चौथे स्थान पटकावले.
तिच्या या लक्षवेधी कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून तिच्या कामगिरीला दाद दिलीये. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्यात अपयश आले असले तरी इथपर्यंतचा प्रवास हा प्रेरणादायी असल्याचे मोदींनी म्हटले आहे. अदिती उत्तम खेळली. पदक मिळवण्याची संधी किंचित हुकली असली तरी गोल्फमध्ये आतापर्यंत जे घडलं नव्हतं ते तिन करुन दाखवलं. तिची ही कामगिरी अभिमानास्पदच आहे, अशा शब्दांत मोदींनी अदिती अशोकचं कौतुक केलं आहे.
ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरीचा नजारा दाखवून देणाऱ्या अदिती अशोकनं चौथ्या आणि अखेरच्या राउंडमध्ये दुसऱ्या क्रमांकावरुन सुरुवात केली होती. शंभर वर्षानंतर रिओ ऑलिम्पिकमध्ये गोल्फचा समावेश करण्यात आला त्यावेळी देखील अदितीने भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. गत ऑलिम्पिक स्पर्धेत तिला 41 व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर यंदाच्या स्पर्धेत तिने दिमाखदार खेळ करुन दाखवला. शेवटच्या क्षणापर्यंत तिने पदकाची आस कायम ठेवली होती.
पण अखेरच्या क्षणात जपान आणि न्यूझीलंडच्या खेळाडूंनी आघाडी घेतली आणि भारताचे पदकाचे स्वप्न अधूरे राहिले. जगातील अव्वल दर्जाची अमेरिकन गोल्फर नॅली कोरडा हिने सुवर्ण पदक पटकावले. जपानती मोने इनामी आणि न्यूझीलंडच्या लीडिया यांच्यात रौप्य पदकासाठी प्लेऑफची लढत झाली. यात इनामीने बाजी मारली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.