Olympics : जे 25 वर्षांत घडलं नाही ते नागलनं करुन दाखवलं

सुमित नागलने 2 तास आणि 34 मिनिटे रंगलेल्या सामन्यात विजयी सलामी दिली
Sumit Nagal
Sumit Nagal Twitter
Updated on

Tokyo Olympics 2020 : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत टेनिस क्रीडा प्रकारात भारताने दमदार सुरुवात केलीय. पुरुष एकेरीत सुमित नागलने विजयी सलामीसह नवा इतिहास रचलाय. त्याने डेनिस इस्तोमिनला तीन सेटमध्ये पराभूत करत दुसरी फेरी गाठलीये. मागील 25 वर्षांत ऑलिम्पिक स्पर्धेत एकेरीत विजयी सुरुवात करणारा तो तिसरा भारतीय टेनिसपटू ठरलाय. सुमित नागलने 2 तास आणि 34 मिनिटे रंगलेल्या सामन्यात इस्तोमिन याला 6-4, 6-7, 6-4 अशा फरकाने पराभूत केले. दुसऱ्या फेरीत त्याचा सामना जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या डॅनिल मेदवेदेव याच्याशी होणार आहे. (Tokyo Olympics 2020 Sumit Nagal Becomes Only Third Indian Win A Singles Match At Olympic)

यापूर्वी 1988 च्या सियोल ऑलिम्पिक स्पर्धेत जीशान अलीने टेनिस पुरुष एकेरीत पराग्वेच्या विक्टो काबालेरोला पराभूत केले होते. याशिवाय लिएंडर पेसने 1996 च्या अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत ब्राझीलच्या फर्नांडो मेलिजेनीला मात दिली होती. यावेळी लिएंडर पेसने कांस्य पदक जिंकले होते.

Sumit Nagal
कोरोना निर्बंध; पाहा मीराबाई पदक स्वीकारताना काय घडलं (VIDEO)

लिएंडर पेसनंतर कोणत्याही भारतीय टेनिसपटूला ऑलिम्पिक स्पर्धेत एकेरीत मॅच जिंकता आली नव्हती. सोमदेव देववर्मन आणि विष्णू वर्धन 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कोर्टवर उतरले. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

Sumit Nagal
मीराबाई चानूनं रचला इतिहास; भारताला मिळवून दिलं पहिलं पदक

ऑलिम्पिकपूर्वी नागल सर्वोत्तम कामगिरी करण्यात फारसा यशस्वी ठरला नव्हता. मात्र स्पर्धेत त्याने कमालीचा खेळ दाखवला. इस्तोमिनची सर्व्हिस ब्रेक करत त्याने पहिला सेट आपल्या नावे केला. दुसऱ्या सेटमध्ये त्याने 4- 1 अशी आघाडी घेतली होती. या आघाडीनंतरही त्याला सेट जिंकण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागला. इस्तोमिन याने हा सेट टायब्रेकरपर्यंत खेचला. अखेरच्या सेटमध्ये नागलने आपल्यातील सर्वोत्तम खेळ दाखवला. आता त्याच्यासमोर ऑस्ट्रेलियन ओपनचा उप विजेता मेदवेदेव याचे आव्हान असेल. मेदवेदेवने कझाकिस्तानच्या अलेक्झांडर बुबलिकला 6-4, 7- 6 असे पराभूत करत आगेकूच केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.