Olympics: मनिका बत्राला नखरा महागात पडणार

मायदेशी परतल्यानंतर तिला कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
Manika Batra
Manika Batra PTI
Updated on

भारताची स्टार टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशवासियांना निराश केले. तिच्याकडून पदकाची अपेक्षा होती. पण तिचा प्रवास तिसऱ्या फेरीतच संपुष्टात आला. सामन्यादरम्यान कोचसोबत नसल्याची किंमत तिला पराभवाच्या रुपात मोजावी लागली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिकमध्ये कठोर नियमावलीचे पालन करण्यात येत आहे. मनिकाचे वैयक्तिक कोच असणारे सन्मय परांजपे यांना सामन्यावेळी तिच्यासोबत राहण्याची परवानगी मिळाली नव्हती. त्यानंतर मनिकाने टोकाचा निर्णय घेतला होता.

राष्ट्रीय कोच सौम्यदीप रॉय यांच्याकडून कोणतेही मार्गदर्शन घेणार नसल्याची भूमिका तिने घेतली. याची किंमत तिला पराभवाने चुकवावी लागली. हिशोब इथेच संपलेला नाही. मायदेशी परतल्यानंतर तिला कारवाईला सामोरे जावे लागू शकते. टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) ने मनिका बत्राच्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. तिने केलेले कृत्य नियमबाह्य आहे. कार्यकारी मंडळाच्या बैठकीत मनिकाच्या वर्तणुकीसंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी माहिती समोर आली आहे. पुढील महिन्यात ही बैठक पार पडणार आहे.

Manika Batra
Olympics : महिला खेळाडूसोबत कोचनं असं का केलं? व्हिडिओ व्हायरल

भारतीय टेबल टेनिस संघाचे राष्ट्रीय कोच सौम्यदीप रॉय यांनी 2006 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होता. त्यांना अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या 4 सदस्यीय भारतीय टेबल टेनिस संघाचे ते एकमेव कोच होते.

Manika Batra
Olympics : पदकाची आस जागवणाऱ्या पूजाची संघर्षमय कहाणी

मनिका वैयक्तिक कोच परांजपे यांच्यासह टोकियोला गेली होती. पण त्यांच्यासोबत केवळ सराव करण्याची परवानगी मनिकाला देण्यात आली होती. त्यांना स्टेडियममध्ये एन्ट्री न मिळाल्याचा राग मनिकाने राष्ट्रीय टीमच्या कोचवर काढला. ती कोशिवाय खेळली. तिची ही भूमिका अयोग्य होती, असे टीटीएफआयचे अध्यक्ष अरुण कुमार यांनी म्हटले आहे. शिस्तभंगासंदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल, असे संकेतही त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.