चक दे इंडिया! मध्य रेल्वेच्या 'चार-चौघींची' ऑलिम्पिकसाठी निवड

16 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघातील 13 खेळाडू भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत आहेत
indian women hockey team player
indian women hockey team playere sakal
Updated on

मुंबई : टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील चार खेळाडूंची राष्ट्रीय महिला हॉकी संघात निवड झाली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघातील 16 सदस्यांच्या संघात मध्य रेल्वेच्या 4 खेळाडूंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. 16 सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघातील 13 खेळाडू भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत आहेत. (Tokyo Olympics 2021 Central Railway 4 Woman Players Select Team India)

indian women hockey team player
WTC INDvsNZ : पावसाची 'कसोटी'; पहिला दिवस पाण्यात!

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात तिकिट तपासणी संवर्गात काम करणारे हेड टिसी मोनिका मलिक, हेड टीसी सुश्री वंदना कटारिया, हेड टीसी सुशिला चानू पुखरांबम् आणि हेड टीसी स्टँड-इन गोल कीपर सुश्री रजीनी एतिमारपु या चार महिला खेळाडूंची भारतीय ऑलिम्पिक महिला हॉकी संघात निवड झाली आहे. या खेळाडू मागील काही वर्षांपासून मध्य रेल्वेकडून सराव आणि खेळत आहेत. या चारही महिला खेळांडूचे प्रशिक्षक माजी राष्ट्रीय हॉकीपटू अर्जुन पुरस्कार प्राप्त हेलन मेरी आणि माजी राष्ट्रीय हॉकीपटू सरिता ग्रोव्हर असून त्या मध्य रेल्वेत कार्यरत आहेत.

(कुलदीप घायवट, संपादन- सुशांत जाधव)

indian women hockey team player
WTC Final 2021 : संजना-बुमराहच्या मुलाखतीवर कमेंटची 'बरसात'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.