टोकियो: टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेत भारताची सुपर मॉम मेरी कोमने (India's Super Mom Mary Kom) विजयी सलामी दिली. 51 किलो वजनी गटात खेळणाऱ्या मेरी कोमने आपल्या पहिल्या सामन्यात डोमिनिक रिपब्लिकच्या गार्सियावर मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत तिच्याकडून पदकाची आस आहे. तिने नावाला साजेसा खेळ करत गार्सियाचा 4-1 असा सहज पराभव केला. या विजयासह तिने राऊंड ऑफ 16 मधील स्थान पक्के केले. आता दुसऱ्या लढतीत ती कोलंबियाच्या इनग्रीट वलेन्सिया (Ingrit Valencia) विरुद्ध भिडेल. 29 जुलैला ही लढत रंगेल. (Tokyo Olympics 2021 Mary Kom Beat M Hernandez and Meat Colombian female boxer Ingrit Valencia In Second Round)
मेरी कोमला चारही प्रशिक्षकांनी 30, 28, 29, 30, 29 असे गुण दिले तर गार्सियाला 27, 29, 28, 27, 28 गुण मिळाले. यापूर्वी भारताचा बॉक्सर विकास कृष्णाला पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. 69 किलो वजनी गटातील लढतीत जपानच्या मेनसाहने 5-0 असा विजय नोंदवला होता.
टेबल टेनिसमध्ये मनिकाचा संघषपूर्ण विजय
दुसरीकडे टेबल टेनिसमध्ये (Table tennis) महिलांच्या एकेरी सामन्यात भारताची स्टार मनिका बत्राने (Manika Batra) पहिले दोन सेट गमावल्यानंतर विजय मिळवला. पिछाडीवरुन झोकात कमबॅक करत तिने युक्रेनच्या मारग्रेट पेसोत्सका हिला 4-3 असे पराभूत केले. 57 मिनिटांच्या लढतीत मनिकाने संघर्षपूर्ण विजय नोंदवत स्पर्धेतील आशा जिंवत ठेवल्या आहेत. तिने 4-11, 4-11, 11-7, 12-10, 8-11, 11-5, 11-7 असा सामना जिंकला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.