Olympic: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विजय, महिला हॉकी संघाची उपांत्यपूर्व फेरीची आशा कायम

भारतीय महिला हॉकी संघाचा दक्षिण आफ्रिकेवर शानदार विजय.
 Indian Womens Hockey
Indian Womens HockeyTwitter
Updated on

टोक्यो: टोक्यो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेत एकाबाजूला भारताचा पुरुष हॉकी संघ दमदार कामगिरी करत असताना, महिला हॉकी संघानेही तोच कित्ता गिरवण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सामन्यात भारतीय महिला हॉकी (indian women hockey team) संघाने ४-३ ने विजय मिळवला. वंदना कटारियाच्या गोलच्या हॅट्ट्रीकमुळे भारताला हा विजय संपादन करता आला. (Tokyo Olympics India beat South Africa 4-3 in contention to qualify for women's hockey quarter finals dmp82)

या विजयामुळे भारतीय महिला हॉकी संघाच्या उपांत्यपूर्व फेरीत दाखल होण्याच्या अपेक्षा कायम आहेत. भारतीय महिला हॉकी संघाचे उपांत्यपूर्व फेरीत दाखल होणे ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडमधील सामान्याच्या निकालावर अवलंबून आहे. आयर्लंडने हा सामना जिंकला, तर महिला हॉकी संघाचे उपांत्यपूर्व फेरीत दाखल होण्याचे स्वप्न संपुष्टात येईल.

 Indian Womens Hockey
...तरच सैन्य माघारी फिरेल, भारताने चीनला केलं स्पष्ट

गटवार साखळीतील अखेरच्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने विजय मिळवला. भारतान दक्षिण आफ्रिकेचा ४-३ ने पराभव केला. टोक्यो ऑलिम्पिकमधील भारतीय महिला हॉकी संघाचा हा दुसरा विजय आहे. ग्रेट ब्रिटनचा महिला हॉकी संघ मजबूत आहे. ते गतविजेते आहेत. आयर्लंडने हा सामना बरोबरीच सोडवला किंवा विजय मिळवला तर महिला हॉकी संघाचे आव्हान संपुष्टात येईल. पण ब्रिटन जिंकला तर भारताचा पुढचा मार्ग सुकर होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.