भारतीय चमूच्या शानदार कामगिरीवर व्यक्त केला विश्वास
Tokyo Olympics: कोरोनाच्या सावटामुळे २०२० मध्ये रद्द झालेले ऑलिम्पिक २०२१ मध्ये सुरळीत पार पडले. महत्त्वाची बाब म्हणजे या ऑलिम्पिकमध्ये भारताने सर्वात दमदार कामगिरी केली. भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ७ पदके जिंकली. भारताच्या नीरज चोप्राने सुवर्णपदकाची कमाई केली. मीराबाई चानू आणि रवी कुमार दहिया या दोघांना रौप्यपदक मिळाले. तर पी व्ही सिंधू, लोवलिना बोर्गोहेन आणि बजरंग पुनिया यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतीय पुरूष हॉकी संघानेही कांस्यपदक कमावले. आतापर्यंत ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. भारताची ही कामगिरी म्हणजे फक्त सुरूवात आहे, अशी भावना भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे महासचिव राजीव मेहता यांनी व्यक्त केली.
"सर्वप्रथम मी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणाऱ्या साऱ्या खेळाडूंचे अभिनंदन करतो. भारतीय चमूने ज्या प्रकारची कामगिरी केली, त्यापेक्षा चांगलं दुसरं काहीही नाही. आपल्या नीरज चोप्राने अथलेटिक्समध्ये पहिलं सुवर्णपदक, ट्रॅक अँड फिल्डमध्ये पहिलं सुवर्ण आणि ऑलिम्पिक मिळवलं. भारताने ज्या पद्धतीचे यश मिळवले आहे ते पाहून मी इतकंच सांगेन की ही तर फक्त सुरूवात आहे. पुढे अजूनही चांगल्या पद्धतीचं यश भारतीय संघ ऑलिम्पिक स्पर्धेत मिळवेल", असे मेहता यांनी स्पष्ट केले.
भारताचा प्रत्येक खेळाडू हा विजेता; PM मोदींकडून जपानचंही कौतुक
"टोकियो ऑलिम्पिक २०२० ची आज सांगता झाली. मी भारतीय खेळाडूंच्या चमूचं शानदान कामगिरीबद्दल अभिनंदन करु इच्छितो. या खेळांमध्ये त्यांनी आपलं सर्वोत्तम कौशल्य, सांघिक कार्य समर्पण वृत्तीने व्यक्त केलंय. भारताने जिंकलेली पदके नक्कीच आपल्या राष्ट्रासाठी अभिमानास्पद आहेत आणि देशासाठी आनंदाचं कारण आहेत. पण त्यासोबतच भारताचं प्रतिनिधित्व करणारा प्रत्येक खेळाडू हा विजेता आहे", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.