पुरुष हॉकी संघाचं 'सुवर्ण' स्वप्न भंगलं, कांस्यसाठी लढणार

पुरुष हॉकी संघाचं 'सुवर्ण' स्वप्न भंगलं, कांस्यसाठी लढणार
Updated on

India vs Belgium Hockey : टोक्यो ऑलिंपिक स्पर्धेत उपांत्य सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. रोमांचक सामन्यात बेल्जियम संघाने भारतीय संघाचा 2-5 च्या फरकाने पराभव केला आहे. अॅलेक्झँडर हेंड्रीक्सने तीन गोल डागत भारतीय संघाच्या विजयाचं स्वप्न भंग केलं. ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी यांच्यातील पराभूत संघासोबत भारतीय संघ कांस्यपदाकासाठी लढणार आहे. तर यातील विजेता संघ सुवर्णपदकासाठी बेल्जियमसोबत दोन हात करेल. बेल्जियमने लागोपाठ दुसऱ्यांदा ऑलिंपिकच्या अंतिमफेरीत प्रवेश केला आहे.

चार क्वार्टरमध्ये बेल्जियमला तब्बल 13 पॅनेल्टी शूट आऊट मिळाले. बेल्जियमने भारतीय संघावर दबाव करण्याचा प्रयत्न केला. बेल्जियमच्या आक्रमणाला भारतीय संघाने सडेतोड उत्तर दिले. पहिल्या तीन क्वार्टरमध्ये भारतीय संघाने बेल्जियमवर दबाव निर्माण केला होता. मात्र, अखेरच्या क्वार्टरमध्ये बेल्जियमने तीन गोल करत भारताच्या सुवर्ण विजयाचे स्वप्न धुळीस मिळवलं. पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने 2-1 ने आघाडी घेतली होती. सामना सुरु झाल्यानंतर पहिल्या काही मिनिटांत बेल्जियमने गोल करत दबाव निर्माण केला होता. मात्र, काही मिनिटांत भारतीय संघाने पलटवार करत बरोबरी केली.

पुरुष हॉकी संघाचं 'सुवर्ण' स्वप्न भंगलं, कांस्यसाठी लढणार
२२ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल; पाहा नवे नियम

1-1 अशी बरोबरी साधल्यानंतर भारतीय संघाने लगेच दुसरा गोल करत सामन्यात आघाडी मिळवली. पहिल्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी मिळवली होती. दुसऱ्या क्वार्टमध्ये बेल्जियमने जोरदार प्रतिकार केला. भारतीय संघाने सर्व हल्ले निकामी केले. दुसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस गोल करत बेल्जियमने 2-2 अशी बरोबरी साधली. तिसऱ्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघाने गोल करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र, कुणालाही गोल करण्याची संधी मिळाली नाही. अखेरच्या क्वार्टरमध्ये बेल्जियमने आपला खेळ अधिक उंचावर तीन गोल केले.

पुरुष हॉकी संघाचं 'सुवर्ण' स्वप्न भंगलं, कांस्यसाठी लढणार
HSC Result 2021 : बारावीचा निकाल आज, कसा अन् कुठे पाहाल?

भारतीय पुरुष हॉकी संघाला अद्याप पदाकाची आशा आहे. सुवर्णपदकाचे स्वप्न भंगलं असले तरिही पदक अद्यापही दृष्टीक्षेपात आहे. 1980 नंतर भारतीय संघाला अद्याप ऑलिंपिकमध्ये पदक जिंकता आलेलं नाही. ऑस्‍ट्रेलिया आणि जर्मनी यांच्यातील पराभूत संघासोबत कांस्य पदकासाठी भारतीय संघ दोन हात करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.