ऑलिम्पिक पूर्वी भारताला धक्का, पैलवान सुमीत डोपिंगमध्ये फेल

भारतीय कुश्ती महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, सुमीतची 10 जून रोजी आणखी एक चाचणी होणार आहे. या चाचणीपूर्वी तात्पुरत्या स्वरुपात त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
sumit malik
sumit maliktwitter
Updated on

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का बसलाय. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेला भारतीय पैलवान सुमीत मलिक डोपिंग टेस्टमध्ये फेल ठरलाय. त्याच्यावर प्रतिबंधित उत्तेजक पदार्थ सेवन केल्याचा आरोप आहे. युनाइटेड वर्ल्ड रेसलिंगने अँटी डोपिंग नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केलीये. भारतीय कुस्ती महासंघाने (WFI) या वृत्ताला दुजोरा दिलाय. (indian-wrestler-sumit-malik-fails-in-dope-test)

राष्ट्रकुल स्पर्धेत केली होती गोल्डन कामगिरी

सुमीतने 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले होते. त्याने 125 किलो वजनी गटातून ऑलिम्पिक पात्रता सिद्ध केली होती. यापूर्वी 2016 मध्ये ओलिम्पिकमध्ये पैलवान नरसिंह यादव डोपिंगमध्ये दोषी आढळला होता. ऑलिम्पिकला मुकण्यासोबतच नरसिंह यादवला चार वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागले होते.

sumit malik
राशिद खानने नाकारली कॅप्टन्सीची ऑफर

10 जूनला होणार आणखी एक टेस्ट

भारतीय कुश्ती महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, सुमीतची 10 जून रोजी आणखी एक चाचणी होणार आहे. या चाचणीपूर्वी तात्पुरत्या स्वरुपात त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जाणीवपूर्वकरित्या कोणताही प्रतिबंधित पदार्थाचे सेवन केलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून दुखापतीचा सामना करत असताना काही औषधे घेतली आहेत. कदाचित त्यामुळेच डोपिंगमध्ये फेल झालो, अशी प्रतिक्रिया सुमितने दिलीये.

100 भारतीय खेळाडूंनी मिळवलंय ऑलिम्पिकच तिकीट

राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (NADA) ने या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. सुमीत डोपिंग टेस्टमध्ये फेल झाल्यामुळे भारतावर एक कोटा गमावण्याची भिती निर्माण झालीये. 11 खेळ प्रकारात भारतातील 100 खेळाडूंनी ऑलिम्पिंकसाठी पात्रता मिळवली आहे. याशिवाय आणखी 25 जण ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील अशी अपेक्षा आहे. 23 जुलै पासून ऑलिम्पिकला सुरुवात होणार आहे.

sumit malik
टीम इंडिया इंग्लंडला घरातही रडवणार, गावसकरांची भविष्यवाणी

सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीवर संकट

2016 मध्ये नरसिंह यादव डोपिंगमध्ये दोषी आढळल्यामुळे ऑलिम्पिकची वारी हुकला होता. 74 किलो वजनी गटातून ऑलिम्पिकला जाण्यासाठी नरसिंह यादवला संधी होती. दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळवणाऱ्या सुशील कुमारच्या जागेवर तो भारताचे प्रतिनिधीत्व करणार होता. यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला. सुशील कुमारने नरसिंग यादवच्या जेवणात उत्तेजक पदार्थ मिसळला, असा आरोपही करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.