Olympics: 'गोल्डन' मॅन नीरजवर बक्षीसांची बरसात; वाचा सविस्तर

Olympics: 'गोल्डन' मॅन नीरजवर बक्षीसांची बरसात; वाचा सविस्तर नीरजने भारताला पहिलंवहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिलं Tokyo Olympics Neeraj Chopra Gold Medal in Javelin Throw 6 Crore rupees Rewards and much more see List vjb 91
Golden-Man-Neeraj-Chopra
Golden-Man-Neeraj-Chopra
Updated on

नीरजने भारताला पहिलंवहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिलं.

Tokyo Olympics: टोकयो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिकमध्ये पुरुष भालाफेक (Men's Javelin) प्रकारात भारताच्या नीरज चोप्राने इतिहास रचला. पात्रता फेरीत चमकदार कामगिर करणारा नीरज अंतिम फेरीत अधिकच निखरला. त्याने यंदाच्या स्पर्धेत भारतीयांसाठी सोनेरी आनंद मिळवून दिला. सर्वात लांब भालाफेक करत त्याने सुवर्णपदक पटकावले. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत हे भारताचं पहिलंच सुवर्णपदक ठरलं. 2008 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनव बिंद्रा याने शूटिंगमध्ये भारताला एक सुवर्णपदक मिळवून दिलं. त्यानंतर वैयक्तिक खेळांमध्ये हे भारताचं दुसरं सुवर्णपदक ठरलं.

Golden-Man-Neeraj-Chopra
Olympics: बजरंगला कांस्यपदक; इनाम म्हणून काय-काय मिळालं पाहा

हरयाणाच्या नीरजवर सुवर्णकमाईनंतर शुभेच्छांची आणि बक्षीसांची लयलूट होताना दिसली. अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या. हरयाणा सरकारने आपल्या तर्फे ठरल्याप्रमाणे नीरजला ६ कोटींचा इनाम जाहीर केला. त्याशिवाय, हरयाणातील पंचकुला या मोठ्या शहरात एक अथलेटिक्स सेंटर उभारलं जाणार असून तेथील मुख्य अधिकारी म्हणून नीरज याची नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री खट्टर यांनी केली. तसेच, ठरल्याप्रमाणे त्याला ५० टक्के सूटीच्या दरात एक प्लॉटदेखील दिला जाईल असेही मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी स्पष्ट केले.

Golden-Man-Neeraj-Chopra
नीरज, तुझं नाव भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहीलं जाईल!

ब्राँझ मेडल विजेत्या बजरंग पुनियालाही इनाम आणि बरंच काही...

मूळचा हरयाणाचा असलेल्या बजरंग पुनियाने ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात ब्राँझपदक पटकावले. त्याने केवळ देशाचेच नव्हे तर हरयाणाचेही नाव जगात पोहोचवले. त्यामुळे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी बजरंगसाठी इनाम जाहीर केला. बजरंग पुनियाने अप्रितम खेळ केला. त्याच्यामुळे हरयाणाचे नाव सर्त्र पोहोचले. त्यामुळे राज्य सरकारच्या योजनेनुसार, हरयाणा सरकारकडून बजरंग पुनियाला २.५० कोटींचे बक्षीस दिलं जाईल. त्यासोबतच सरकारी नोकरी देण्यात येईल. आणि हरयाणातील जमीन ५०टक्के सूटीच्या भावात त्याला विकत घेता येईल. तसेच, बजरंगचे मूळ गाव असलेल्या झझर जिल्ह्यातील खुंदन गावी एक इनडोअर स्टेडियमदेखील बांधण्यात येईल, अशी घोषणा हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.