Tokyo Paralympics Opening Ceremony: टेक चंदने डौलात फडकवला तिरंगा

भारताचा भालाफेकपटू टेक चंद भारताचा ध्वजवाहकाची भूमिका बजावणार आहे.
Tokyo Paralympics Opening Ceremony
Tokyo Paralympics Opening CeremonyTwitter
Updated on

Tokyo Paralympics 2020 Opening Ceremony: टोकियो पॅरा ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या स्पर्धेत भारताचे 54 खेळाडू आपल्यातील कसब दाखवून देण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. भारताचा भालाफेकपटू टेक चंद याने भारताचा ध्वजवाहकाची भूमिका बजावली. यापूर्वी भारताचा ध्वजवाहक म्हणून थंगावेलू मरियप्पनची निवड करण्यात आली होती. पण तो कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्याच्या जागी टेक चंदच्या हाती भारताचा ध्वज देण्याचा निर्णय आयत्यावेळी घेण्यात आला. टेक चंदसह 11 भारतीय सदस्यांनी उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात भाग घेतला होता.

सर्वात पहिल्यांदा जपानचा राष्ट्रध्वज ऑलिम्पिक स्टेडियममध्ये आणण्यात आला. भारतीय संघाने 17 व्या क्रमांकावर मार्चसाठी आल्याचे पाहायला मिळाले. 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधीत रंगणाऱ्या स्पर्धेत 163 देशातील 4500 खेळाडू 22 खेळातील की 540 क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत. आतापर्यंतच्या पॅरा ऑलिम्पिक इतिहासात पहिल्यांदाच भारताचा मोठा ताफा स्पर्धेत सहभागी झाला असून यंदाच्या स्पर्धेत भारताला अधिक पदकाची आस आहे.

मार्च करणाऱ्या यादीत भारतीय संघ 17 व्या स्थानावर होता. भालाफेकपटू टेक चंदने भारताच्या ध्वजवाहकाची भूमिका बजावली.

उद्घाटन समारोह मार्च वेळी आयर्लंड पहिल्या क्रमांकावर. त्यांनी सर्वप्रथम राष्ट्रीय ध्वजसह ऑलिम्पिक स्टेडियममध्ये प्रवेश केला. त्यानंतर इटली आणि इतर देश पाठोपाठ मार्च करत स्टेडियममध्ये दाखल झाले.

पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झाल्याचे संकेत देणारा ध्वज फडकला

उद्घाटन सोहळ्यासाठी सजवण्यात आलेलं व्यासपीठ

163 देशातील जवळपास 4500 खेळा़डू वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात सहभागी झाले आहेत.

भारताचा ध्वजवाहक म्हणून थंगावेलू मरियप्पनची निवड करण्यात आली होती. पण तो कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्याच्या जागी टेक चंद भारताचा ध्वज हाती घेणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील भारताच्या सर्व खेळाडूंना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.