Asian Games: आशियाई खेळात भारतीयांची चमक! तेजींदरपाल सिंह तूरनं गोळाफेकीत जिंकलं सुवर्णपदक

Asian Games
Asian Games
Updated on

नवी दिल्ली- आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू आपली चमक दाखवत आहेत. या स्पर्धेमध्ये भारताच्या तेजिंदरपाल सिंह तूर याला गोळाफेकीमध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे. तेजिंदरपाल सिंह तूरने भारतासाठी तेराव्या सुवर्ण पदकाची कमाई केली. तूरने ७.२६ किलो लोखंडी गोळा २०.३६ मीटर दूरपपर्यंत फेकला. त्याने शेवटच्या प्रयत्नात हे यश मिळवले.

एकूण सहा प्रयत्नांपैकी त्याचे तीन प्रयत्न एकदम योग्य होते. प्रत्येक प्रयत्नात तूरची कामगिरी सुधारत गेली. तीनवेळा गोळाफेक करताना त्याने १९.५१ मीटर, २०.०६ मी आणि २०.३६ मीटर अशा कामगिरीची नोंद केली. त्याच्या शेवटच्या प्रयत्नामुळे त्याने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले.

Asian Games
Asian Games 2023 : भारतीय शूटर्सचा पदकांचा रतीब सुरूच; भारतीय संघाची रूपेरी कामगिरी

चीनच्या हँगझाऊ शहरात आशियाई क्रीडा स्पर्धा सुरु आहेत. अ‍ॅथलेटिक्समधील ३००० मीटर स्टीपलचेस (अडथळ्यांची शर्यत)मध्ये भारताच्या अविनाश साबळेने सुवर्णपदक जिंकले. साबळेने आशियाई रेकॉर्ड देखील मोडला. त्यानंतर तेजिंदरपाल सिंह तूर याने सुवर्ण पदकं जिंकल्याने अ‍ॅथलेटिक्समध्ये दुसरे सुवर्ण भारताच्या नावे झाले आहे.

Asian Games
Asian Games : ऐतिहासिक! गॉल्फमध्ये अदिती अशोकची चमकदार कामगिरी, रौप्य पदकावर कोरलं नाव

तेजिंदरपाल सिंह तूर याने एक विक्रमही आपल्या नावावर केला आहे. तूर गोळाफेक स्पर्धेत दोनवेळा पदकावर नाव करणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. तूरने २०१८ जकार्तामध्ये पदक नावावर केले होते. याआधी प्रद्युमन सिंग ब्रार (१९५४ आणि १९५८), जोंगिदर सिंग (१९६६ आणि १९७०) आणि बाहादूर सिंग चौहान (१९७८ आणि १९८२) यांनी दोनवेळा पदकं जिंकली होती. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.