भारतीय संघात कोरोनाचा शिरकाव

आशियाई महिला फुटबॉल, सलामीच्या लढतीआधी संकटT
Two Player of Indian womens football team test Covid 19 positive
Two Player of Indian womens football team test Covid 19 positive sakal
Updated on

नवी मुंबई : एएफसी आशियाई महिला फुटबॉल करंडकाला उद्यापासून महाराष्ट्रातील तीन स्टेडियम्समध्ये सुरुवात होणार आहे; पण सलामीच्या लढतीआधी पूर्वसंध्येला भारतीय महिला फुटबॉल संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. भारतीय महिला फुटबॉल संघाकडून कोरोना नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचेही यावरून प्रकर्षाने दिसून येत आहे. या दोन्ही खेळाडूंना वैद्यकीय सुविधा पुरवण्यात आली असून दोघींनाही विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामधील एक खेळाडू भारताच्या अंतिम अकरा खेळाडूंच्या यादीत असल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. (Two Player of Indian womens football team test Covid 19 positive)

Two Player of Indian womens football team test Covid 19 positive
SA vs IND : टीम इंडियाच्या पराभवामागची पाच प्रमुख कारण...

भारतीय फुटबॉल संघटनेकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले की, या स्पर्धेमध्ये सहभागी होत असलेल्या सर्व देशांतील फुटबॉलपटूंच्या आरोग्याला व सुरक्षेला आम्ही प्राधान्य देत आहोत. यासाठी आशियाई फुटबॉल संघटनेकडून आरोग्यासंबंधित नियमांची अंमलबजावणीही आमच्याकडून करण्यात येत आहे, असेही त्यांच्याकडून पुढे सांगण्यात आले आहे.

सर्व जैव सुरक्षित वातावरणात

एएफसी आशियाई महिला फुटबॉल या अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळाले आहे. त्यामुळे भारतीय फुटबॉल संघटनेकडून ही स्पर्धा यशस्वी आयोजित करण्यात यावी यासाठी पावले उचलण्यात येत आहेत.

स्पर्धा होणारच

भारतीय फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सोमवारी या स्पर्धेबाबत मत व्यक्त करताना म्हटले की, जोपर्यंत दोन्ही संघांतील प्रत्येकी १३ खेळाडू फिट असतील तोपर्यंत लढत ही होणारच. या स्पर्धेसाठी प्रत्येक संघाला २३ खेळाडूंची निवड करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघातील दोन खेळाडूंना कोरोना झाला असला तरी उद्या होणारी सलामीची लढत नियोजित वेळापत्रकानुसार होईल, असे समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.