U-19 World Cup 2024 : फायनलमध्ये भिडणार भारत-पाकिस्तान ? जाणून घ्या समीकरण

U-19 World Cup 2024
U-19 World Cup 2024
Updated on

ICC Under 19 World Cup 2024 : आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप 2024 अंतिम टप्प्यात आला आहे. भारत, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेनंतर आता पाकिस्तानलाही उपांत्य फेरीचे तिकीट मिळाले आहे.

भारताने सुपर 6 च्या गट 1 मध्ये अव्वल स्थान पटकावले, तर पाकिस्तान दुसऱ्या स्थानावर राहून पात्र ठरला. अशा परिस्थितीत चाहत्यांना भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्याची आशा आहे, पण ते शक्य होईल का? हे जाणून घेऊया....

U-19 World Cup 2024
U19 World Cup : ठरलं तर...! हे संघ 4 उपांत्य फेरीत, भारताचा सामना कोणाशी? जाणून घ्या शेड्यूल

भारताने गट-1 मध्ये अव्वल स्थानावर राहून उपांत्य फेरी गाठली आहे. टीम इंडियाचे 8 गुण आहेत तसेच नेट रन रेट +3.155 आहे. गेल्या सामन्यात बांगलादेशवर विजय नोंदवल्यानंतर पाकिस्ताननेही 8 गुण गाठले आहेत. पण नेट रनरेटच्या बाबतीत ते टीम इंडियाच्या मागे पडले. पाकिस्तानचा निव्वळ रन रेट +0.752 आहे.

उपांत्य फेरीत भारताचा सामना कोणाशी होणार?

उपांत्य फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. गट-2 मध्ये ऑस्ट्रेलियन संघ 7 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे, तर दक्षिण आफ्रिकेने 6 गुणांसह दुसरे स्थान मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

अशा परिस्थितीत दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा सामना 8 फेब्रुवारीला पाकिस्तानशी होईल, तर पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना 6 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेशी होईल.

U-19 World Cup 2024
Joe Root IND vs ENG : इंग्लंडला एक फलंदाज पडणार शॉर्ट... अडचणीत आलेल्या इंग्लंडला रूटनं दिलं टेन्शन?

फायनलमध्ये भिडणार भारत-पाकिस्तान ? जाणून घ्या समीकरण

जर पहिल्या उपांत्य फेरीत सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला, आणि दुसऱ्या उपांत्य फेरीत सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान सामना पाहिला मिळेल. या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी 11 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.