U 19 WC Semi Final 2 : भारत-ऑस्ट्रेलिया सामना कधी आणि कुठे पाहाल?

U 19 World Cup India U 19 vs Australia U 19  Super League Semi Final 2
U 19 World Cup India U 19 vs Australia U 19 Super League Semi Final 2Sakal
Updated on

U 19 World Cup India U 19 vs Australia U 19 Super League Semi Final 2 : वेस्ट इंडीजमध्ये सुरु असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगणार आहे. इंग्लंडच्या संघाने पहिल्या सेमी फायनलमध्ये अफगाणिस्तानला नमवत फायनल गाठली आहे. दुसऱ्या सेमी फायनलमधील विजेता शनिवारी इंग्लंडविरुद्ध फायनल खेळताना दिसेल.

भारतीय संघ (India U19 ) या स्पर्धेत ब गटात होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीने युवा टीम इंडियाने स्पर्धाला सुरुवात केली होती. सलामीच्या सामन्यात यश धूल (Yash Dhull) च्या नेतृत्वाखालीली युवा टीम इंडियाने ( India U19 ) 45 धावांनी विजय नोंदवला होता. भारतीय संघाने आयर्लंडला 174 धावांनी तर युंगाडाचा 326 धावांनी दारुण पराभव केला होता. क्वार्टर फायनलच्या लढतीत टीम इंडियाने बांगलादेशला पराभूत करत सेमी फायनलच तिकीट मिळवलं आहे. भारतीय संघानं स्पर्धेत एकही सामना गमावलेला नाही. ही गोष्ट सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला अधिक बळ देणारी ठरेल. (U 19 World Cup India U 19 vs Australia U 19 Super League Semi Final 2 When And Where To Watch Live Telecast Streaming)

U 19 World Cup India U 19 vs Australia U 19  Super League Semi Final 2
U19 World Cup: इंग्लंडची 24 वर्षांची प्रतिक्षा संपली

दुसरीकडे साखळी सामन्यात ड गटात खेळलेल्या ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीज, स्कॉटलंड यांना पराभूत केले होते. तर श्रीलंकेविरुद्ध त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. क्वार्टर फायनलमध्ये पाकिस्तानला 119 धावांनी पराभूत करत ऑस्ट्रेलियाने सेमी फायनल गाठली आहे.

U 19 World Cup India U 19 vs Australia U 19  Super League Semi Final 2
Video: 'यश'च्या यशाचा मास्टर माईंड लक्ष्मण

सामना कुठे रंगणार? Where is India U19 vs Australia U19 match taking place?

भारतीय अंडर 19 संघ आणि ऑस्ट्रेलिया अंडर 19 संघ यांच्यातील दुसरा सेमी फायनल सामना सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. हा सामना अँटिगाच्या कॉलिज क्रिकेट ग्राउंडवर (Coolidge Cricket Ground, Antigua) खेळवण्यात येणार आहे.

सामना कुठे पाहता येणार? (How to watch the India U19 vs Australia U19 match online?)

स्टार स्पोर्ट्सवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमी फायनल लढत पाहता येईल. याशिवाय Disney+ Hotstar वरही या सामन्याचा आनंद घेता येईल. याशिवाय सकाळच्या ऑनलाईन बेवसाईटवरही सामन्याच्या लाईव्ह अपडेट्स आणि रंजक क्षणाचे खास व्हिडिओ आणि बातम्या तुम्ही पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.