प्रो कबड्डी सीझन २ विजेता U Mumba संघ ११ व्या हंगामासाठी सज्ज; प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

Pro Kabaddi season 11: प्रो कबड्डी लीगच्या ११ व्या हंगामासाठी यू मुंबाने सराव सुरू केला आहे.
u mumba
u mumbaesakal
Updated on

U Mumba: प्रो कबड्डी लीगचा ११ वा हंगाम १८ ऑक्टोबरपासून हैदराबाद येथे सुरू होत आहे. दुसऱ्या हंगामातील चॅम्पियन यू मुंबा संघ आगामी हंगामासाठी सज्ज होत आहे. यू मुंबाने अहमदाबादमध्ये ४० दिवसांचा प्रशिक्षण शिबिर आयोजित केला असून शिबिरासाठी अनुभवी व युवा अशा एकूण २१ खेळाडूंची फळी अहमदाबाद येथे दाखल झाली आहे.

यू मुंबाने अहमदाबादमधील विंधाम हॉटेल व क्लब ०७ येथे मुख्य प्रशिक्षक गोलामरेझा मझांदारानी आणि सहाय्यक प्रशिक्षक अनिल चप्राना यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणची सुरुवात केली आहे. यू मुंबा दबंग दिल्ली विरुद्ध सराव सामना खेळून सराव सामना खेळून शिबिराची सुरूवात करेल. या शिबिरादरम्यान खेळाडूंची तंदुरुस्ती आणि सहनशक्ती वाढीसोबतच आगामी हंगामाकरीता रणनिती देखील आखण्यात येईल.

u mumba
IND vs BAN 1st Test : Virat Kohli वर रोहित वैतागला; 'तो' एक निर्णय ज्याने अम्पायरही चकित झाले

मुख्य प्रशिक्षक गोलामरेझा मझांदारानी आणि सहाय्यक प्रशिक्षक अनिल चप्राना यांच्याकडे व्यापक अनुभव व नेतृत्व क्षमता आहे. प्रशिक्षकांनी आगामी हंगामासाठी कमकुवत बाजूंवर काम करून संघाला सज्ज करण्याची तयारी दाखवली आहे.

“मी या नवीन संघासोबत काम करण्यास उत्सुक आहे. आम्हाला सुधारणेची आवश्यकता असलेले क्षेत्र बळकट करायचे आहे. गेल्या हंगामाची सुरुवात चांगली झाली असली तरी ती आमच्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी झाली नाही. आम्हाला कशावर काम करण्याची आवश्यकता आहे याची मला कल्पना आहे. माझा प्रशिक्षण सुविधा आणि सपोर्ट स्टाफवर विश्वास आहे. आम्ही आगामी हंगाम यशस्वी होण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करू,” प्रशिक्षक गोलामरेझा मझांदारानी म्हणाले.

यू मुंबाने लीलावादरम्यान सुनील कुमारला १.०१५ कोटींमध्ये करारबद्ध केले असून तो प्रो कबड्डी लीगचा ११ मध्ये सर्वाधिक बोली लागणारा बचावपटू ठरला. तर यू मुंबाने यावेळी इराणच्या अमीर मोहम्मद जफरदानेश आणि बचावपटू रिंकू यांनाही करारबद्ध केले. ज्यात रेडर मनजीत आणि स्टुअर्ट सिंग,अमीन घोरबानी यांचाही समावेश आहे. या हंगामात परवेश भैसवाल सोबत सुनील कुमारची जोडी एकत्र खेळेल.

u mumba
IND vs BAN: अ‍ॅक्शन रिप्ले! Rohit Sharma दुसऱ्या डावातही फसला; एकाच पद्धतीने पुन्हा OUT झाला, जैस्वालही गंडला

यू मुंबा संघाचे सीइओ सुहेल चंधोक म्हणाले,“आम्हाला लिलावामध्ये अनुभवी खेळाडू आणि तरुण प्रभावी खेळाडूंचा संतुलित संघ तयार करता आला याचा आम्हाला आनंद आहे. मला वाटते की गेल्या काही वर्षांमध्ये आमच्याकडे अनुभवी खेळाडूंचा अभाव होता. हा मुद्दा विचारात घेवून आम्ही नवा संघ तयार केला आहे.

हंगामपूर्व शिबिरात खरे काम सुरू होते. त्यामुळे हा टप्पा महत्त्वाचा आहे. कारण खेळाडू, प्रशिक्षक आणि सर्व सहाय्यक कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या प्रयत्नांचा थेट परिणाम लीगमधील कामगिरीवर होत असतो.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.