U19 WC 2022 : कांगारुंची शिकार; युवा टीम इंडिया फायनलमध्ये

U19 World Cup 2022  India U19 Beat Australia U19 Reach Final
U19 World Cup 2022 India U19 Beat Australia U19 Reach Final Sakal News
Updated on

U19 World Cup 2022, Semi-Final 2 : अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या दुसऱ्या सेमी फायनल लढतीत कांगारुंची (Australia U19) शिकार करत यश धूलच्या (Yash Dhull) नेतृत्वाखालील भारतीय संघाने (ndia U19) दिमाखात फायनल गाठली आहे. भारतीय संघाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 194 धावांत आटोपला. भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये 96 धावांनी विजय नोंदवला याआधी इंग्लंडच्या संघाने पहिल्या सेमी फायनलमध्ये अफगाणिस्तानला नमवत फायनल गाठली होती. इंग्लंडचा संघ पहिल्यांदाच फायनलमध्ये पोहचला आहे. त्यामुळे भारतीय संघाचा फायनल पेपरही तसा सोपाच आहे.

अँटिगाच्या कॉलिज क्रिकेट ग्राउंडवर (Coolidge Cricket Ground, Antigua) रंगलेल्या सेमी फायनलमध्ये भारतीय संघाचा कर्णधार यश धूलनं टॉस (India U19 Captain Yash Dhull) जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला त्याचा हा निर्णय फोल ठरतोय का? असा प्रश्न निर्माण झाला होता. कारण भारतीय संघाच्या धावफलकावर अवघ्या 37 धावां असताना दोन्ही सलामीवीर तंबूत परतले होते. कर्णधार यश धूल () आणि शेख राशीद यांनी तिसऱ्या विकेटसाठी 204 धावांची धमाकेदार भागीदारी करत भारतीय संघाचा डाव सावरला. धूलनं 110 चेंडूत 110 धावा केल्या. दुसरीकडे त्याला राशीदनं 108 चेंडूत 94 धावा करत उत्तम साथ दिली. या दोघांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित 50 षटकात 5 बाद 290 धावा करत ऑस्ट्रेलियासमोर 291 धावांच लक्ष्य ठेवलं होतं.

U19 World Cup 2022  India U19 Beat Australia U19 Reach Final
U 19 WC 2022 : यश धूलचं विक्रमी शतक; कोहलीच्या रेकॉर्डशी बरोबरी

या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. रवी कुमारनं दुसऱ्या षटकात ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्यानंतर ठराविक अंतराने ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के बसतच राहिले. आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी फिरल्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून Lachlan Shaw नं अर्धशतकी खेळी केली. त्याच्याशिवाय सलामीवीर कॅम्पबेल (Campbell Kellaway) 30 (53), कोरी मिलर (Corey Miller) 38 (46), जॅक सिनफिल्ड (Jack Sinfield) 20 (14) राधाकृष्णन (Nivethan Radhakrishnan) 11 (15) या फलंदाजांशिवाय अन्य कुणालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही.

U19 World Cup 2022  India U19 Beat Australia U19 Reach Final
श्रेयस अय्यर, शिखर धवन, ऋतुराज गायकवाड; अर्ध्या टीमला कोरोनाची बाधा

भारताकडून विक्की ओस्तवाल (Vicky Ostwal) याने सर्वाधिक 3, रवी कुमार (Ravi Kumar) 2 निशांत सिंधू (Nishant Sindhu) 2, कुशल तांबे (Kaushal Tambe) 1 आणि रघुवंशीनं (Angkrish Raghuvanshi) 1 विकेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.