U19 World Cup 2024 Final : संपूर्ण स्पर्धेत फेल गेलेल्या हरजास सिंगचे फायनलमध्ये अर्धशतक, भारताला रचावा लागणार इतिहास

U19 World Cup 2024 Final : भारताला ऑस्ट्रेलियाच्या तळातील फलंदाजांनीच दमवले.
U19 World Cup 2024 Final  Harjas Singh
U19 World Cup 2024 Final Harjas Singhesakal
Updated on

U19 World Cup 2024 Final Harjas Singh : भारताने प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरूद्ध ठराविक अंतराने विकेट्स घेतल्या. मात्र मधल्या फळीतील फलंदाज हरजास सिंगने अर्धशतक ठोकत भारताचे टेन्शन वाढवले. त्यानंतर शेपटाने जास्त वळवळ केल्याने भारताला आता 254 धावांचे आव्हान पार करावे लागणार आहे.

19 वर्षाखालील वर्ल्डकप फायनलमधील धावांचा पाठलाग करताना ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. भारताने जर ही धावसंख्या चेस केली तर तो इतिहास रचेल. यापूर्वी 1998 मध्ये इंग्लंडने न्यूझीलंडविरूद्ध 242 धावांचे लक्ष्य पार केलं होतं.

हरजास सिंग हा संपूर्ण स्पर्धेत फेल गेला होता. त्याने संपूर्ण स्पर्धेत 39 धावा केल्या होत्या. मात्र फायनलमध्ये त्याने 55 धावांची खेळी केली. त्यानंतर ऑलिव्हर पिकने नाबाद 46 धावा करत शेवटच्या 10 षटकात संघाला 66 धावा जोडून दिल्या. भारताकडून राज लिंबानीने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या तर नयन तिवारीने 3 विकेट्स घेत चांगली साथ दिली.

U19 World Cup 2024 Final  Harjas Singh
Ind vs Aus U19 WC Final : ऑस्ट्रेलियाने केला भारताचा पराभव, चौथ्यांदा कोरलं वर्ल्डकपवर नाव

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला राज लिंबानीने पहिला धक्का दिला होता. त्याने सलामीवीर कोनस्टासला शुन्यावर बाद केलं. त्यानंतर मात्र दुसरा सलामीवीर डिक्सन आणि वेबगेन यांनी भागीदारी रचत संघाल 20 षटकात 94 धावांवर पोहचवले. मात्र ही जोडी नमन तिवारीने फोडली त्याने 48 धावांवर वेबगेनची खेळी संपवली.

पाठोपाठ डिक्सन देखील 42 धावांवर बाद झाला. त्याची देखील शिकार तिवारीनेच केली. ऑस्ट्रेलियाची 3 बाद 99 अशी अवस्था झाली असताना भारतीय वंशाच्या हरजास सिंगने 55 धावांची अर्धशतकी खेळी करत ऑस्ट्रेलियाला 150 धावांचा टप्पा पार करून दिला. लिंबानीने हिक्सला बाद करून सिंगचा जोडीदार बाद केला. तर सौम्य पांडेने 55 धावांची खेळी करणाऱ्या सिंगला पायचित पकडत भारताला मोठा दिलासा दिला.

यानंतर मुशिर खानने गेल्या सामन्यातील हिरो राफ मॅकमिलनला 2 धावांवर बाद करत मोठी विकेट घेतली. लिंबानीने अँडरसनला 13 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाची अवस्था 7 बाद 221 अशी केली.

U19 World Cup 2024 Final  Harjas Singh
Ranji Trophy Records : जलज सक्सेनाने रचला इतिहास; मात्र निधिशच्या एका विकेटने स्वप्न राहिले अधुरे

मात्र सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऑलिव्हर पिकने तळातील दोन फलंदाजांच्या साथीने शेवटच्या 10 षटकात 66 धावा जोडल्या. ऑलिव्हरने नाबाद 46 धावांची खेळी केली. त्याने टॉम स्ट्रेकरसोबत आठव्या विकेटसाठी 32 धावंची भागीदारी रचली. यामुळे ऑस्ट्रेलिया 250 धावांचा टप्पा पार करू शकली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.