Naman Tiwari
Naman Tiwariesakal

U19 World Cup Final : बुमराहकडून मिळाल्या टिप्स, खतरनाक 'यॉर्कर' टाकणारा नमन तिवारी आहे तरी कोण?

U19 World Cup Final : भारताचा युवा वेगवान गोलंदाज म्हणतो जगातील सर्वात वेगवान चेंडू टाकयचा आहे.
Published on

U19 World Cup 2024 Final Fast Bowler Naman Tiwari : भारतीय संघ 19 वर्षाखालील वर्ल्डकपच्या फायनलमध्ये पोहचला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया रविवारी 11 फेब्रुवारीला विजेतेपदासाठी भिडणार आहे. भारत आपले सहावे विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाला आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये भारताचा वेगवान गोलंदाज नमन तिवारीने सर्वांनाच प्रभावित केलं. त्याचा यॉर्कर तर चांगलाच व्हायरल झाला होता.

लखनौचा असलेल्या नमन तिवारीने नुकतीच पीटीआयला मुलाखत दिली. त्यावेळी त्याने फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरूद्ध तो जसप्रीत बुमराहने दिलेल्या टिप्सचा वापर करणार असल्याचे सांगितलं. नमनला जसप्रीत बुमराहने एनसीएमध्ये असताना खूप टिप्स दिल्या होत्या. त्याचा फायदा त्याला यंदाच्या वर्ल्डकपमध्ये होत आहे.

Naman Tiwari
Cristiano Ronaldo Vs Lionel Messi : रोनाल्डोची मैदानावरच सटकली, कारण ठरला लिओनेल मेस्सी; पाहा VIDEO

यॉर्कर आणि वेगासाठी प्रसिद्ध आहे नमन

नमन तिवारीने 19 वर्षाखालील वर्ल्डकप 2024 मध्ये 5 सामन्यात 10 विकेट्स घेतल्या आहेत. स्पर्धेत त्याचा घातक यॉर्कर चांगलाच चर्चेत आला होता. नमनने आयर्लंडविरूद्धच्या सामन्यात चार विकेट्स घेतल्या होत्या. नमन यॉर्करसोबतच आपल्या वेगासाठी देखील प्रसिद्ध आहे. त्याचे प्रेरणास्थान हे जसप्रीत बुमराह आहे.

बुमराहने शिकवला यॉर्कर

नमन तिवारीने सांगितले की तो जसप्रीत बुमराहचे बरेच व्हिडिओ पाहतो. मी त्याला एनसीएमध्ये अनेकवेळा भेटलो आहे. त्यावेळी त्याने मला नेहमी गोलंदाजीबाबत अनेक महत्वाच्या टिप्स दिल्या आहेत. बुमराहने दिलेल्या टिप्स स्पर्धेत मला खूप उपयोगाला आल्या. तिवारीने सांगितले की बुमराहने त्याला यॉर्कर कसा टाकायचा याच्या टिप्स दिल्या. त्याच्यावर मी भरपूर काम केलं. आता त्यात आक्रमकपणा आणण्यावर काम करायचं आहे.

Naman Tiwari
Ravindra Jadeja Father Interview : वडिलांची मुलाखत पूर्णपणे चुकीची... जडेजाच्या घरातील वाद आला चव्हाट्यावर

फलंदाज म्हणून कारकीर्द केली सुरू

नमन तिवारीने सांगितले की त्याने फलंदाज म्हणून क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली होती. मात्र फलंदाजी करण्याची फारशी संधी मला मिळत नव्हती. लखनौच्या अकॅडमीत मी गोलंदाजीचा सराव करण्यास सुरूवात केली.

नमनने सांगितले की त्याला जगातील सर्वात वेगवान चेंडू टाकायचा आहे. त्यासाठी मी खूप मेहनत करत आहे. नमनला वरिष्ठ संघाकडून वर्ल्डकप देखील खेळायचा आहे. मात्र सध्या च्याचे लक्ष हे ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या फायनलवर आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()