U19 World Cup : 397 धावा... पण भारतीय कर्णधाराला मिळाला नाही 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' अवॉर्ड, नक्की दिला तरी कोणाला?

गतविजेत्या भारतीय क्रिकेट संघाला 19 वर्षांखालील क्रिकेट वर्ल्ड कपचे जेतेपद राखता आले नाही.
u19 world cup kwena maphaka gets player of the Tournament award uday saharan 397 runs over shadow-in-2024 cricket news in marathi
u19 world cup kwena maphaka gets player of the Tournament award uday saharan 397 runs over shadow-in-2024 cricket news in marathi
Updated on

U19 World Cup : गतविजेत्या भारतीय क्रिकेट संघाला 19 वर्षांखालील वर्ल्ड कपचे जेतेपद राखता आले नाही. ऑस्ट्रेलियन संघाने येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघावर 79 धावांनी दमदार विजय मिळवला आणि तब्बल 14 वर्षांनंतर विश्‍वविजेता होण्याचा मान संपादन केला. याआधी त्यांनी 2010 मध्ये न्यूझीलंड येथे झालेल्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कपच्या अजिंक्यपदावर मोहोर उमटवली होती.

भारतीय संघाला 2020 नंतर या स्पर्धेच्या उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गेल्या वर्षभरात ऑस्ट्रेलियन संघाकडून तीन महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. दोन वरिष्ठ संघानंतर आता ज्युनियर संघावर ही आपत्ती ओढवली.

u19 world cup kwena maphaka gets player of the Tournament award uday saharan 397 runs over shadow-in-2024 cricket news in marathi
Ranji Trophy : पराभव टाळण्यासाठी महाराष्ट्राची झुंज; विदर्भाला डावाने विजयाची आशा

भारताचा कर्णधार उदय सहारन याने या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. गोलंदाजीच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेची युवा वेगवान गोलंदाज क्वेना माफाका पहिल्या स्थानावर आहे. त्यामुळे त्याला प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार देण्यात आला.

उदय सहारनने अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप 2024 च्या 7 सामन्यात एक शतक आणि 3 अर्धशतकांच्या मदतीने सर्वाधिक 397 धावा केल्या. मात्र, फायनलमध्ये उदयची बॅट शांत राहिली. 2 शतके आणि एक अर्धशतकाच्या जोरावर 360 धावा करून मुशीर खान दुसऱ्या क्रमांकावर राहिला.

गोलंदाजीत क्वेना माफाकाने 6 सामन्यात 21 बळी घेतले. त्याने या स्पर्धेत तीन वेळा पाच विकेट्स घेतल्या. 17 वर्षीय माफाकाला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. माफाकाला दक्षिण आफ्रिकेचा भावी कागिसो रबाडा म्हटले जात आहे. माफाकाची उंची रबाडाइतकी नसली तरी या नवोदित डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने आपल्या धारदार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले.

u19 world cup kwena maphaka gets player of the Tournament award uday saharan 397 runs over shadow-in-2024 cricket news in marathi
Jack Leach : इंग्लंडचा जॅक लीच दुखापतीमुळे बाहेर; भारताविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यांना मुकणार

फिरकीपटू सौम्या पांडेने 2024 च्या अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने 7 सामन्यात 18 बळी घेऊन या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. सौम्याने 3 वेळा 4 विकेट्स घेतल्या. या स्पर्धेतील त्याची सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे 19 धावांत 4 बळी. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे. सचिन दास पाचव्या क्रमांकावर होता ज्याने 7 सामन्यात 303 धावा केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()