NAM vs UAE : नामिबियाचे चित्ते पडले मागे! लंका - नेदरलँड पोहचली सुपर 12 मध्ये

UAE Defeat Namibia In T20 World Cup 2022 Qualifier
UAE Defeat Namibia In T20 World Cup 2022 Qualifier ESAKAL
Updated on

T20 World Cup 2022 NAM vs UAE : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामिबियामधून आणलेल्या चित्त्यांचे स्वागत केले. यानंतर भारतातील अनेकांना नामिबिया या आफ्रिकी देशाबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. दरम्यान, नामिबियाचा क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी 20 वर्ल्डकप पात्रता फेरीत पहिल्याच सामन्यात आशिया कप विजेत्या श्रीलंकेचा पराभव करत पुन्हा एकदा चर्चेत आला. असे वाटले की नामिबिया आता सुपर 12 मध्ये दाखल होणार. मात्र ग्रुप A मधील शेवटच्या सामन्यात युएईकडून त्यांचा 7 धावांनी पराभव झाला अन् नामिबियाचे हे चित्ते सुपर 12 च्या रेसमध्ये मागे पडले. आता ग्रुप A मधून श्रीलंका आणि नेदरलँड हे दोन संघ सुपर 12 मध्ये खेळणार आहेत.

UAE Defeat Namibia In T20 World Cup 2022 Qualifier
Cameron Green : ऑस्ट्रेलियाचा इंग्लिस आऊट; भारताविरूद्ध 200 चा स्ट्राईक असलेल्या ग्रीनची वर्णी

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीने 20 षटकात 3 बाद 148 धावा केल्या. सलामीवीर मोहम्मद वासीमने 41 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. तर कर्णधार रिझवानने 29 चेंडूत नाबाद 43 धावा केल्या. अरविंद आणि बसिल हमीदने अनुक्रमे 21 आणि 25 धावांचे योगदान दिले. नामिबियाकडून विजे, बेन शिकोंगो आणि स्कॉल्ट्झ यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

UAE Defeat Namibia In T20 World Cup 2022 Qualifier
Roger Binny : मयंती लँगरने सासरेबुवा BCCI अध्यक्ष होताच दिली प्रतिक्रिया, ट्विट करत..

युएईचे 149 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या नामिबियाची सुरूवात खराब झाली. त्यांनी पॉवर प्लेमध्येच 26 धावात 3 फलंदाज गमावले. युएईने नामिबियाला ठराविक अंतराने धक्के देणे सुरूच ठेवले. त्यांनी 46 धावात नामिबियाचा निम्मा संघ माघारी धाडला. युएईच्या जहूर खानने नामिबियाला अजून दोन धक्के देत त्यांची अवस्था 7 बाद 69 अशी केली. मात्र यानंतर नामिबियाच्या डेविड विजे आणि रूबेन थ्रुमपेलमानने कडवी झुंज देत अर्धशतकी भागीदारी रचली. विजेने अर्धशतक ठोकत सामना 6 चेंडूत 14 धावा असा जवळ आणला.

UAE Defeat Namibia In T20 World Cup 2022 Qualifier
Non Strike Run Out : रवी शास्त्री म्हणतात, नियम म्हणजे नियम.. करा बिनधास्त!

त्यात युएईला अपेक्षित षटकांची गती राखता न आल्याने शेवटच्या षटकात फक्त 4 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर ठेवावे लागले. मात्र याचा फायदा नामिबियाला उठवता आला नाही. पहिल्या तीन षटकात 4 धावा दिल्यानंतर मोहम्मद वासीमने झुंजार फलंदाज विजेला 55 धावांवर बाद केले. अखेर नामिबियाला शेवटच्या षटकात 6 धावाच करता आल्या. त्यामुळे त्यांचा 7 धावांनी पराभव झाला. नामिबियाने शेवटच्या षटकापर्यंत झुंज देत 20 षटकात 8 बाद 141 धावांपर्यंत मजल मारली. युएईकडून जहूर खान आणि बासिल हमीद यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.