Uber Cup 2024 Badminton: भारतीय महिलांची शानदार सलामी, कॅनडाला 4-1 ने दिली मात; अस्मिता छलिहाचा लक्षवेधी विजय

India Women Badminton Team: भारतीय महिला बॅडमिंटन संघाने कॅनडाचा पराभव करत उबेर कप स्पर्धेत शानदार सुरुवात केली.
Ashmita | India Women Badminton Team
Ashmita | India Women Badminton TeamSakal
Updated on

India Women Badminton Team: शनिवारी (२७ एप्रिल) चेंग्दू, चीन येथे सुरु झालेल्या उबेर करंडक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या नवोदित महिला संघाने शानदार सुरुवात केली. भारतीय महिला संघाने कॅनडाचा ४-१ असा पराभव करुन दणक्यात सुरुवात केली.

आसामच्या अस्मिता छलिहा आणि इशारानी बारुआ, मणिपूरच्या प्रीया कोंजेनबाम यांनी अनुभवी खेळाडू संघात नसतानाही धैर्य दाखवले, तर १७ वर्षीय अनमोल खारब आणि श्रृती मिश्रा यांनी आपली गुणवत्ता सादर केली.

भारतीय संघात २४ वर्षीय अस्मिता हीच एकेरीतील अनुभवी खेळाडू आहे. तिचा सामना कॅनडाची विख्यात खेळाडू मिचेली ली हिच्याविरुद्ध झाला.

Ashmita | India Women Badminton Team
Gymnastics : जेएसडब्ल्यू व लीप जिम्नॅस्टिक दहा हजार जिम्नॅस्टिक घडवणार

या सामन्यात जागतिक क्रमवारीत ५३ व्या क्रमांकावर असलेल्या अस्मिताने २५ व्या क्रमांकावर असलेल्या मिचेल लीला २६-२४, २४-२२ अशी मात केली.

पहिल्या गेमध्ये अस्मिता १-६ असे पिछाडीवर पडली होती, परंतु ५-७ अशी पिछाडी भरून काढल्यानंतर ९-८ आणि ११-१० अशी आघाडी घेऊन उमेद कायम ठेवली आणि तेथून पुढे आत्मविश्वास उंचावत तिने मिचेलीचा प्रतिकार मोडून काढला.

महिलांच्या दुहेरीत प्रीया आणि श्रृती मिश्रा आणि कॅनडाच्या जोडीवर २१-११, २१-१० अशी सहज मात करुन भारताला २-० आघाडी मिळवून दिली. प्रीया आणि श्रृती या राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्या आहेत.

Ashmita | India Women Badminton Team
DC vs MI, IPL: लाईव्ह सामन्यात पंतला आवरेना रोहितने हाती दिलेला पतंग उडवण्याचा मोह, Video Viral

दुहेरीतील या शानदार यशानंतर तिसऱ्या एकेरीत २० वर्षीय इशारानी हिनेही आपला ठसा उमटवला आणि वेन यू झँग हिचा २१-१३, २१-१३ असा पराभव करुन ३-० अशी आघाडी मिळवून दिली.

महिलांच्या दुसऱ्या दुहेरीत मात्र भारताच्या सिमरन आणि रितिका यांना जॅकी डेंट व क्रिस्टल लाई यांच्याकडून १९-२१, १५-२१ अशी हार स्वीकारावी लागली. अखेरच्या एकेरीत अनमोलने जागतिक क्रमवारीत ८५ व्या स्थानावर असलेल्या एलिना झँगचे आव्हान २१-१५, २१-११ असे मोडून काढले आणि भारताच्या ४-१ अशा वर्चस्वावर मोहोर उमटवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.