Euro 2024 Final Spain vs England : स्पेन युरो चॅम्पियन! नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; इंग्लंडचा ५८ वर्षांचा दुष्काळ कायम

UEFA European Football Championship 2024 Spain vs England Final : युरो चषक २०२४ स्पर्धेची फायनल कमालीची चुरशीची राहिली. पहिला हाफ गोलशून्य राहिल्यानंतर शेवटच्या ४५ मिनिटांत उत्कंठा वाढवणारा खेळ ठरला.
UEFA Euro 2024 Spain vs England Final
UEFA Euro 2024 Spain vs England Final sakal
Updated on

UEFA European Football Championship 2024 Spain vs England Final : युरो चषक २०२४ स्पर्धेची फायनल कमालीची चुरशीची राहिली. तीन वेळचा विजेत्या स्पेनने पहिल्या ४५ मिनिटांत वर्चस्व गाजवल्यानंतर इंग्लंडवर दडपण निर्माण केले. तिच लय कायम राखताना स्पेनने ४७व्या मिनिटाला निको विलियम्सच्या अप्रतिम गोलच्या जोरावर आघाडी मिळवली. पहिल्या युरो चषक विजयाच्या शोधात असलेल्या इंग्लंडला ७३व्या मिनिटाला कोल पाल्मरने बरोबरी मिळवून दिली. पण, स्पेन हार मानणारे नव्हते आणि ८७व्या मिनिटाला मिकेल ओयारझबालच्या भन्नाट गोलने स्पेनला पुन्हा आघाडी मिळवून दिली. स्पेनने २-१ अशा विजयासह ( १९६४, २००८, २०१२, २०२४) सर्वाधिक चार युरो चषक स्पर्धेची जेतेपदं नावावर करताना जर्मनीला ( १९७२, १९८०, १९९६) मागे टाकले.

युरो चषक स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच दोन युवा खेळाडू फायनल खेळले. स्पेनकडून लामिने यमाल ( १७ वर्ष) व इंग्लंडकडून कॉबी मैनू ( १९ वर्ष) या युवा खेळाडूंनी सर्वांचे लक्ष वेधले होते. स्पेनकडून सातत्याने इंग्लंडच्या पेनल्टी क्षेत्रावर आक्रमण सुरू राहिले. इंग्लंडच्या बचावफळीला स्पेनचे डावपेच सेट होऊ देत नव्हते. १२व्या मिनिटाला स्पेनचा विलियम्स चेंडू सहजतेनं सहा यार्ड बॉक्सजवळ घेऊन गेला होता. स्पेन गोलखाते उघडेल असे वाटत असताना इंग्लंडच्या स्टोन्सने सुरेख बचाव केला आणि इंग्लंडच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. पण, यानंतर इंग्लंडचे खेळाडू चेकाळले आणि पुढील २ मिनिटांत गोलचे प्रयत्न झालेले दिसले. स्पेनच्या सुदैवाने गोल झाला नाही.

२३ व्या मिनिटाला यमालकडून ऑफ टार्गेट प्रयत्न झाला. दोन मिनिटांत इंग्लंडचे खेळाडू चेंडू घेऊन पेनल्टी क्षेत्रात शिरले आणि स्पेन गोंधळला, परंतु इंग्लंडने ही सुवर्णसंधी गमावली. ४३व्या मिनिटाला मोराटाने इंग्लंडच्या सहा यार्ड बॉक्समध्ये खळबळी माजवली होती, परंतु स्पेन पुन्हा गोल करण्याच्या अगदी जवळ पोहोचून रिकाम्या पाटीसह परतला. ४५+१ मिनिटाला इंग्लंडची फ्री किकवर गोल करण्याचा प्रयत्न स्पेनच्या गोलरक्षकाने हाणून पाडला. पहिल्या हाफमध्ये स्पेनचे वर्चस्व राहिले असले तरी इंग्लंडकडून झालेले २-३ प्रयत्न हे त्यांची चिंता वाढवणारे नक्कीच होते. पहिल्या ४५ मिनिटांत दोन्ही संघांना गोल करता न आल्याने दुसऱ्या हाफमधील उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

स्पेनने दुसऱ्या हाफमध्ये पहिल्याच मिनिटाला गोल मिळवला. ४७व्या मिनिटाला यमालच्या पासवर निको विलियम्सने डाव्याबाजूने इंग्लंडच्या गोलरक्षकाला चकवून अप्रतिम गोल केला. पुढच्याच मिनिटाला ऑल्मोनेही तसाच गोल करण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळी स्पेनला यश नाही मिळालं. पण, स्पेनच्या या आक्रमणामुळे इंग्लंडची झोप नक्की उडवली. European Championship Final आघाडी घेतल्यानंतर स्पेन एकदाही ( ३ पैकी ३ जिंकले) हरलेले नाहीत. स्पेन वेगळ्याच दर्जाचा सूर पकडून मैदानावर उतरलेले दिसले आणि त्यांच्याकडून सातत्याने गोलसाठी प्रयत्न होत राहिले.

६१व्या मिनिटाला इंग्लंडने त्यांचा कर्णधार हॅरी केनला माघारी बोलवून ऑली वॉटकिन्सला मैदानावर उतरवले. ६३व्या मिनिटाला वेलिंगहॅमने इंग्लंडला बरोबरी मिळवून देण्याचा सुरेख प्रयत्न केला, परंतु चेंडू ऑफ टार्गेट राहिला. यमालकडून ६६ व्या मिनिटाला झालेला ऑन टार्गेट प्रयत्न इंग्लंडचा गोलरक्षकाने अडवला. अशी कामगिरी ७३ व्या मिनिटाला स्पेनच्या गोलरक्षकाला जमली नाही. कोल पाल्मरने ( Cole Palmer) ३० यार्ड बॉक्सबाहेरून सुरेख गोल करून इंग्लंडला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. तीन मिनिटांपूर्वी पाल्मर बदली खेळाडू म्हणून मैदानावर उतरला होता. ८२व्या मिनिटाला यमालने गोलजाळीच्या दिशेने चेंडू भिरकावला, परंतु इंग्लंडचा गोलरक्षक तो रोखण्यासाठी सज्ज होता. स्पेनचा दुसरा गोल थोडक्यात हुकला.

८७व्या मिनिटाला मिकेल ओयारझबालच्या भन्नाट गोलने स्पेनला पुन्हा आघाडी मिळवून दिली. इंग्लंडला सामना बरोबरीत आणण्यासाठी ६ मिनिटे हाती होती. ८९व्या मिनिटाला इंग्लंडचा दुसरा गोल जवळपास झालाच होता, परंतु गोलरक्षकाला चकवून गोलजाळीत जाणारा चेंडू स्पेनच्या खेळाडूने हेडरद्वारे माघारी पाठवला. हा गोल स्पेनचा विजय पक्का करण्यासाठी पुरेसा ठरला. इंग्लंडला सलग दुसऱ्यांदा युरो चषक स्पर्धेच्या फायनलमध्ये हार पत्करावी लागली.

  • १९६६ नंतर इंग्लंडला एकही मोठी स्पर्धा जिंकता आलेली नाही. ५८ वर्षांपूर्वी इंग्लंडने घरच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर २०२० युरो चषक स्पर्धेची फायनल ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. त्यात त्यांना इटलीकडून हार मानावी लागली होती.

  • निको विलियम्स ( २२ वर्ष व २ दिवस) हा युरो फायनलमध्ये गोल करणारा दुसरा युवा खेळाडू ठरला. इटालियन पिएट्रो अनास्तासीने १९६८मध्ये २० वर्ष व ६४ दिवसांचा असताना गोल केला होता.

  • युरो चषक स्पर्धेच्या एका पर्वात ४ सहाय्य करणारा लामिने यमाल हा ( १७ वर्ष व १ दिवस) इतिहासातील सर्वात युवा खेळाडू ठरला.

  • इंग्लंडसाठी महत्त्वाच्या स्पर्धेत नॉक आऊट सामन्यात गोल व सहाय्य करणारा कोल पाल्मर हा पहिला खेळाडू ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.