बिजिंग पॅरालिंम्पिकमध्ये युद्धग्रस्त युक्रेनची दणक्यात पदकांची कमाई

War Torn Ukraine Grab 2nd Spot in Beijing Paralympic Winter Games
War Torn Ukraine Grab 2nd Spot in Beijing Paralympic Winter Games esakal
Updated on

बिजिंग : रशियाने आक्रमण केल्यानंतर (Russia Ukraine War) युक्रेनमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. युक्रेनही रशियन फौजांना कडवा प्रतिकार करत आहे. एकीकडे युक्रेन (Ukraine) स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वासाठी झुंज देत आहे दुसरीकडे युक्रेनचे खेळाडू चीनमध्ये जाऊन आपल्या देशाचा झेंडा उंचावत आहेत. बिजिंगमध्ये सुरू असलेल्या पॅरालिंम्पिक स्पर्धेत (Beijing Paralympic Winter Games) युक्रेन पदकांची दणक्यात कमाई करत आहे. युक्रेनने आज (बुधवार दि. 09) पॅरालिंम्पिक विंटर गेम्समध्ये पदक तालिकेत दुसरे स्थान पटकावले.

War Torn Ukraine Grab 2nd Spot in Beijing Paralympic Winter Games
चेन्नईला मोठा दिलासा; 14 कोटीची गुंतवणूक कामाला येणार

युक्रेनने बिजिंग पॅरालिंम्पिक विंटर गेम्समध्ये आतापर्यंत एकूण 17 पदकांची (Ukraine Medal) कमाई केली. यात 6 सुवर्ण, 7 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. सध्या पदक तालिकेत 27 पदकांसह चीन अव्वल स्थानावर आहे. यात 8 सुवर्ण, 8 रौप्य आणि 11 कांस्य पदकांचा समावेश आहे. 14 पदकांसह कॅनडा पदक तालिकेत तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.

War Torn Ukraine Grab 2nd Spot in Beijing Paralympic Winter Games
पुढच्या पिढीने 1000 विकेट्सचे स्वप्न बाळगू नये : अश्विन

बिजिंग पॅरालिंम्पिक विंटर गेम्स 4 मार्च ते 13 मार्च दरम्यान खेळवली जात आहे. या स्पर्धेत जगभरातील खेळा सहभागी झाले असून जवळपास 6 खेळांचे 78 क्रीडा प्रकार बिजिंग पॅरालिंम्पिक विंटर गेम्समध्ये होत आहेत. यातील 39 क्रीडा प्रकार पुरूषांचे तर 35 क्रीडा प्रकार हे महिलांचे होणार आहेत. तर 4 क्रीडा प्रकार मिश्र प्रकारात होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.