Women’s Boxing World Championship : पुढील महिन्यात नवी दिल्लीत होणाऱ्या महिला बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेल्या देशांच्या वाढत्या यादीत युक्रेन सामील झाला आहे. रशियन आणि बेलारूसियन बॉक्सरच्या समावेशामुळे अनेक देशांनी चॅम्पियनशिपमधून माघार घेतली आहे.
युक्रेन व्यतिरिक्त याआधी युनायटेड स्टेट्स, ब्रिटन, स्वित्झर्लंड, पोलंड, नेदरलँड, आयर्लंड, झेक प्रजासत्ताक, स्वीडन आणि कॅनडा हे इतर देश आहेत ज्यांनी महिलांच्या जागतिक चॅम्पियनशिप स्पर्धेतून माघार घेतली.
रशियन खेळाडूंच्या सहभागामुळे दिल्लीत होणाऱ्या महिला जागतिक चॅम्पियनशिपवर युक्रेन बॉक्सर बहिष्कार टाकला आहेत. युक्रेनच्या बॉक्सिंग फेडरेशनचे उपाध्यक्ष ओलेग इल्चेन्को यांनी युक्रेनियन स्पोर्ट वेबसाइटवर म्हटले की, आमच्या देशाचे बॉक्सर युद्ध करण्याऱ्या देशाविरुद्ध एकाच मंचावर स्पर्धा करणार नाहीत.
रशिया आणि युक्रेन युद्धला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले. आधीच अडचणीत आलेले आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशन युद्धनंतर अधिक समस्यांमध्ये सापडले आहे, कारण त्याचे अध्यक्ष रशियन अधिकारी उमर क्रेमलेव आहेत. ज्यांना व्लादिमीर पुतिन यांचे मित्र म्हणून पाहिले जाते.
गेल्या ऑक्टोबरमध्ये क्रेमलेव्हने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या शिफारशींच्या विरोधात जाऊन रशिया आणि बेलारूसच्या बॉक्सर्सवर आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांच्या स्वत:च्या ध्वजाखाली स्पर्धा करण्यावरील बंदी उठवली. भारतीय बॉक्सिंग फेडरेशनने बुधवारी सांगितले की, 74 देशांतील 350 हून अधिक बॉक्सर या स्पर्धेत भाग घेतील, तसेच पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्रता स्पर्धा दुप्पट होईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.