रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धाचा (Russia Ukraine War) भडका उडाला आहे. रशियाने चार दिवसांपूर्वी युक्रेनमध्ये सैन्य कारवाई सुरू करत आपले लष्कर युक्रेनमध्ये घुसवले. (Russia Ukraine Crisis) याला प्रतिकार करण्यासाठी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलिंस्की (Volodymyr Zelensky) यांनी रशियाचे आक्रमण थोपवण्यासाठी हातात शस्त्रे (Rifle) घेण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर युक्रेनमधील सामान्य नागरिक तसेच प्रसिद्ध व्यक्ती देखील आपल्या देशासाठी हातात शस्त्रे घेत आहेत. युक्रेनचा 36 वर्षाचा टेनिसपटू सर्गिये स्टॅकोस्कीनेही (Sergiy Stakhovsky) टेनिस रॅकेट सोडून आता देशासाठी बंदुक हातात घेतली आहे.
स्टॅकोस्की याने सांगितले की तो रशियाच्या आक्रमणाचा (Russian Invasion) मुकाबला करण्यासाठी देशाच्या लष्करात (Ukraine Army) सामील झाला आहे. स्टॅकोस्की हा जागतिक टेनिस क्रमवारीत 31 व्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे 2013 ला त्याने विंम्बल्डनमध्ये रॉजर फेडररचा पराभव केला होता. सर्गियो स्टॅकोस्की म्हणाला की एकदा का त्याची पत्नी आणि मुले हंगेरीत सुरक्षित पोहचले की तो हातात शस्त्र घेऊन लढण्यास सज्ज होईल.
स्काय न्यूजला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणतो की, 'नक्कीच मी लढणार. मी गेल्याच आठवड्यात लष्कराच्या अतिरिक्त तुकडीच सामील झालो आहे. मला लष्करी अनुभव नाही मात्र मी बंदुक चालवली आहे. माझ्याकडे बंदुक आहे.' स्टॅकोस्कीने आपल्या या निर्णयावर कुटुंबियांची काय प्रतिक्रिया होती हेही सांगितले. तो म्हणाला की, 'माझे वडील आणि भाऊ दोघेही सर्जन आहेत. ते या निर्णयामुळे तणावात आले आहे. मात्र मी त्यांच्याशी सातत्याने बोलत आहे. ते बेसमेंटमध्ये झोपतात.'
दुसरीकडे युक्रेनची 21 वर्षाची महिला टेनिसपटू डायना (Dayana Yastremska) म्हणते की तिने आणि तिच्या कुटुंबियांनी दोन रात्री बंकरमध्ये आश्रय घेतला आहे. ती आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हणते की 'अंडरग्राऊंड पार्किंगमध्ये दोन रात्री घालवल्यानंतर माझ्या पालकांनी निर्णय घेतला की काही झालं तरी मला आणि माझ्या लहान बहिणीला युक्रेनमधून बाहेर काढायचे. आई बाबा आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करतो. तुम्ही तुमची काळजी घ्या. मी माझ्या देशावर खूप प्रेम करते.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.