Umar Akmal : मुलीच्या शाळेची फी भरण्यासाठी पैसेच नव्हते; अकमल म्हणातो माझे 'दुष्मन' देखील यातून जाऊ नयेत

Umar Akmal
Umar Akmal esakal
Updated on

Umar Akmal : पाकिस्तानचा माजी फलंदाज उमर अकमलने आपल्या कठिण काळाबद्दल मोठा खुलासा केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 2020 मध्ये पीसीबीचे भ्रष्टाचार रोखण्यासंबंधीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने उमर अकमलला बडतर्फ केलं होते.

अकमलने या काळात त्याच्यावर आणि त्याच्या कुंटुंबावर काय परिणाम झाला याचा खुलासा केला. अकमलने 2019 मध्ये पाकिस्तानकडून शेवटचा सामना खेळला होता. त्याला अजूनही पाकिस्तान संघात पुनरागमन करण्याची आशा आहे.

Umar Akmal
Asia Cup 2023 : भारत - पाक सामना अवघ्या दोन दिवसांवर असतानाच टीम इंडियाला मोठा धक्का; कोच राहुलने दिली टेन्शनवाली बातमी

अकमलवर पीसीबीने बंदी घातल्यानंतर त्याच्यावर काय परिस्थिती ओढवली होती हे सांगताना अकमल म्हणाला, 'कोणावरही अगदी माझ्या दुष्मनावर देखील अशी परिस्थिती ओढवू नये. अल्लाह एखाद्या व्यक्तीला काहीतरी देऊन किंवा त्याच्याकडून काहीतरी काढून घेत परीक्षा पाहत असतो.'

'ज्यावेळी माझ्यावर वाईट वेळ आली होती. त्यावेळी अनेक लोकांनी त्यांचा खरा चेहरा दाखवला होता. मात्र जे माझ्या पाठीशी उभे राहिले त्यांचा मी आभारी आहे.

Umar Akmal
Rohit Sharma : रोहितची कॅप्टन्सी, चौथ्या क्रमांकावर कोण... गावसकरांच्या मते टीम इंडियासमोर वेगळीच समस्या

अकमल जिओ न्यूजशी बोलताना पुढे म्हणाला की, 'मी माझ्या मुलीला आठ महिने शाळेत पाठवू शकलो नव्हतो. त्या कठिण काळात माझ्या पत्नीने मला धीर दिला.' पाणावलेल्या डोळ्याने अकमल म्हणाला की, 'माझी पत्नी ही अत्यंत श्रीमंत घरात जन्मली होती. तिने मला सांगितले की परिस्थिती कितीही वाईट असली तरी ती कायम माझ्या पाठीशी उभी राहणार. मी यासाठी तिचे आभार मानतो.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.