Cricket News: खळबळजनक! अंपायरने दिला 'नो बॉल' खेळाडूने मैदानातच चाकू भोसकून केला खून

क्रिकेटच्या मैदानात धक्कादायक घटना!
Umpire Stabbed To Death Over No Ball Decision in Odisha Cuttack
Umpire Stabbed To Death Over No Ball Decision in Odisha Cuttack
Updated on

Cricket News : भारतात इंडियन प्रीमियर लीगचा थरार धुमधडाक्यात सुरू झाला, पण ओडिशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे रोमांचक क्रिकेटचा सामना सुरू होता. यादरम्यान पंचांनी 'नो बॉल'चा निर्णय दिला. अंपायरला 'नो बॉल' देण्याचा निर्णय इतका महागात पडला की एका तरुणाने धारदार चाकूने त्याची हत्या केली. हे घटना कटकमधील महिशिलंदा गावात घडली.

Umpire Stabbed To Death Over No Ball Decision in Odisha Cuttack
IPL 2023 Points Table: संजूची RR टॉपवर! चेन्नई-मुंबई पहिल्या पराभवानंतर कुठे... जाणून घ्या पॉइंट टेबल

मिळालेल्या माहितीनुसार, महिसलंदा येथे ही क्रिकेटची स्पर्धा सुरू होती. ब्रह्मपूर आणि शंकरपूर हे दोन्ही संघ शेकडो प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामना खेळत होते. मात्र ब्रह्मपूर संघाविरुद्ध पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याने वाद सुरू झाला. पंचाच्या या निर्णयामुळे गावातील रंजन राऊत नावाचा तरुण संतापला. त्याने पंचाशी वाद घालण्यास सुरुवात केली. हळूहळू वाद वाढत गेला.

दरम्यान, रंजन यांनी मैदानातच चाकू काढला आणि पंचांवर एकामागून एक हल्ला करण्यास सुरुवात केली. चाकूच्या हल्ल्यात पंच गंभीर जखमी झाला आणि तातडीने एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले.

Umpire Stabbed To Death Over No Ball Decision in Odisha Cuttack
IPL: आम्हाला बुमराहशिवाय...रोहित शर्माच्या वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ

उपचारादरम्यान पंचांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण पसरले आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, खबरदारी म्हणून गावात सुरक्षा दलाची तुकडी तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.