Umran Malik Asian Games 2023 : भारतीय संघ सध्या श्रीलंकेत आशिया कप खेळत आहे. सुपर 4 मधील श्रीलंकेविरूद्धचा सामना जिंकून टीम इंडियाने आपले फायनलचे तिकीट निश्चित केले आहे. दुसरीकडे बंगळुरू येथे भारताचा दुसरा युवा संघ एशियन गेम्स 2023 च्या तयारीसाठी एकत्र आला आहे.
मात्र या संघाला सराव सत्रापूर्वीच मोठा धक्का बसला. वेगवान गोलंदाज शिवम मावीला दुखापत झाली असून तो एशियन गेम्सला मुकण्याची दाट शक्यता आहे. ही स्पर्धा पुढच्या महिन्यात चीनमध्ये होणार आहे. शिवम मावीच्या जागी वेगवान गोलंदाज उमरान मलिकची संघात वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार शिवम मावीला कोथ्या प्रकारची दुखापत झाली आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र त्याची रिप्लेसमेंट वरिष्ठ निवडसमिती लवकरच जाहीर करणार आहे.
निवडसमिती स्टँड बाय खेळाडू म्हणून निवड झालेल्या यश ठाकूरला संघासोबत पाठवण्याची शक्यता आहे. मात्र विदर्भच्या वेगवान गोलंदाजाला देखील पाठीची दुखापत झाली आहे. त्यामुळे निवडसमिती शिवम मावीची रिप्लेसमेंट म्हणून उमरान मलिकच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याची शक्यता आहे.
एशियन गेम्स 2023 साठी भारतीय पथकावर अनेक बंधने घातली गेली असल्याने भारतीय संघ अतिरिक्त खेळाडू घेऊन जाऊ शकत नाही.
दरम्यान, भारताच्या युवा संघ राष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीत दोन आठवडे सराव करणार आहे. यासाठी भारतीय संघातील खेळाडूंना बंगळुरू येथे बोलवण्यात आले आहे. या संघाला व्हीव्हीएस लक्ष्मण, साईराज बहुतूले मुनिश बाली हे मार्गदर्शन करणार आहेत.
चीनमधील हांगझू येथे 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान एशियन गेम्सचे आयोजन होणार आहे. यंदा एशियन गेम्ससाठी महिलांसोबतच भारताचा पुरूष क्रिकेट संघ देखील एशियन गेम्समध्ये सहभागी होणार आहे. या संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार आहे.
भारताचा वरिष्ठ संघ हा मायदेशात वनडे वर्ल्डकप खेळणार आहे. त्यामुळे एशियन गेम्ससाठी बीसीसीआयने आपला दुय्यम संघ पाठवण्याचा निर्णय घेतला. या संघाकडून आता उमरान मलिकला आपली क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
भारत एशियन गेम्समधील आपली मोहीम 28 सप्टेंबरला सुरू करणार आहे. तर महिला क्रिकेट संघ 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर पर्यंत सामने खेळेल. हे सामने टी 20 फॉरमॅटमध्ये खेळवले जाणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.