Umran Malik : मलिकचा सर्वात वेगवान चेंडू अडकला वादात; हिंदीचं खंर की इंग्रजीचं...

Umran Malik ODI Fastest ball Controversy
Umran Malik ODI Fastest ball Controversy esakal
Updated on

Umran Malik ODI Fastest ball Controversy : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात विराट कोहलीचे शतक, दसुन शानकाची झुंजार खेळी जशी चर्चाचा विषय ठरली तशीच चर्चा उमरान मलिकच्या एका वेगवान चेंडूची देखील ठरली. उमरान मलिकने आपल्या स्पेलच्या दुसऱ्याच षटकात 156 किमी प्रती तास वेगाने चेंडू टाकला. हा चेंडू इतिहास रचणारा ठरला. भारतीय गोलंदाजाकडून वनडेमध्ये टाकण्यात आलेला हा सर्वात वेगवान चेंडू ठरला.

Umran Malik ODI Fastest ball Controversy
Hockey World Cup 2023 : रणवीर, दिशा पटानीसह स्टार करणार परफॉर्म, कधी अन् कोठे पहायचा Opening Ceremony?

उमरान मलिकने या चेंडूबरोबरच भारताकडून टी 20, वनडे आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. मात्र या चेंडूवर एक वाद उद्भवला आहे. त्यामुळे उमरानचा हा चेंडू विक्रम प्रस्थापित करणारा ठरणार की नाही याबाबत चाहत्यांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.

Umran Malik ODI Fastest ball Controversy
Asia Cup 2023: पाकिस्तानने टेकले गुडघे! जय शहांच्या भेटीसाठी सेठी लावत आहेत जुगाड

जे क्रिकेट चाहते हिंदी समालोचन असलेला चॅनल पाहत होते त्यांना वाटले की उमरानने 156 किमी प्रती तास वेगाने चेंडू टाकत रेकॉर्ड केले. मात्र इंग्रजी समालोचन असलेल्या स्टार स्पोर्ट्स चॅनलवर याच षटकातील चौथा चेंडू 145.7 किमी प्रती तास वेगाने चेंडू टाकल्याचे दाखवण्यात आले. यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. उमरानच्या स्पेलमधील दुसऱ्या षटकाच्या चौथ्या चेंडूचा वेग होता तरी किती असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उमरान मलिकने केल्या 3 शिकार

इंग्रजी आणि हिंदी चॅनलनी घातलेला गोंधळ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला. चाहते स्क्रीन शॉटच्या सहाय्याने याबाबत प्रश्न उपस्थित करत होते. उमरान मलिकने श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात 8 षटके टाकली. त्यात त्याने 57 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

(Sports Latest News)

हेही वाचा : या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.