उमरान मलिक शोएबचा विक्रम मोडण्याबाबत म्हणाला..

उमरानने आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू म्हणजेच ताशी 157 किमी वेगाने चेंडू टाकला होता.
Umran Malik
Umran Malik esakal
Updated on

काही दिवसापूर्वी म्हणजेच आयपीएल १५ सीझनदरम्यान सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा उमरान मलिक याचा वेग पाहून पाकिस्तानाच रावळपिंडी एक्सप्रेस भलताच चकित झाला होता. त्याने उमरानचे कौतुक करताना माझा विक्रम मोडण्यासाठी उमरानने आपली हाडे मोडू नयेत असं म्हटलं होत. अख्तरच्या या वक्तव्यावर उमरानने भाष्य केलं आहे.

Umran Malik
एका वर्षात दोनदा रंगणार IPL चा थरार, फॉरमॅटदेखील तयार?

तो म्हणाला, "माझे लक्ष रेकॉर्डवर नाही, मला चांगल्या क्षेत्रात गोलंदाजी करायची आहे, माझ्या देशाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका जिंकण्यासाठी मदत करायची आहे. मला सतत 150 च्या वेगाने गोलंदाजी करायची आहे जोपर्यंत माझे शरिर मला साथ देईल.

उमरान मलिकने सनरायझर्स हैदराबाद आणि जम्मू-काश्मीर संघ यांच्यातील तुझा जोडीदार अब्दुल समदचे कौतुक केले. अब्दुलने मला खुप प्रोत्साहन दिलं. तो नेहमी मला संत बॉलिंग करतो म्हणून ओरडत असे त्यामुळे माझ सर्व लक्ष वेगवान गोलंदाजी करण्यावर केंद्रीत केले. असे सांगत उमरानने त्याच्या वेगाचे रहस्य उलगडले.

Umran Malik
उमरान मलिकने ब्रेट लीला दिले सडेतोड उत्तर, मी...

अख्तर नेमकं काय म्हणाला होता

यंदाच्या आयपीएलच्या 15 व्या पर्वात सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून उमरान मलिकला ओळखलं जात आहे. उमरान सातत्याने ताशी 150 किमी वेगाने गोलंदाजी करत आहे. या पर्वात उमरानने आयपीएलच्या इतिहासातील दुसरा सर्वात वेगवान चेंडू म्हणजेच ताशी 157 किमी वेगाने चेंडू टाकला आहे. त्याच्या या गोलंदाजीमुळे पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याला भीती वाटत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा २० वर्ष जुना विक्रम मोडीत निघण्याची भीती शोएब अख्तरला आहे.

“मला त्याची प्रदीर्घ कारकीर्द बघायची आहे. नुकतेच कोणीतरी माझे अभिनंदन केले की तुमच्या रेकॉर्डला २० वर्षे पूर्ण झाली आहेत. आतापर्यंत कोणीही तो विक्रम मोडू शकलेला नाही. मग मी म्हणालो की कोणीतरी युवा गोलंदाज असावा ज्याने हा विक्रम मोडलाच पाहिजे. उमरानने जर माझा विक्रम मोडला तर मला आनंदच होईल. फक्त माझा विक्रम मोडताना त्याने स्वत:ची हाडे मोडून घेऊ नयेत. तो तंदुरुस्त राहो हीच माझी प्रार्थना आहे. त्याला दुखापतींचा सामना करायला लागू नये”, असं उमरान मलिकबद्दल शोएब अख्तर म्हणाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.