भारताच्या 'या' क्रिकेटपटूला दंडाबाबत बजावली नोटीस; महसूल विभाग अॅक्शन मोडवर, लेखी उत्तर न दिल्यास होणार कारवाई

cricketer Pravin Amre : अनधिकृत बांधकाम आणि बेकायदेशीर वाळू उत्खनन केल्याप्रकरणी प्रवीण आमरे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
Unauthorized Construction Dispute
Unauthorized Construction Disputeesakal
Updated on
Summary

या नोटिसाला लेखी उत्तर न दिल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे महसूल खात्याने आपल्या नोटिसीमध्ये नमूद केले आहे.

रत्नागिरी : तालुक्यातील जयगडजवळील रिळ ग्रामपंचायतीच्या (Ril Gram Panchayat) हद्दीत भारताचा क्रिकेटपटू प्रवीण आमरे (Cricketer Pravin Amre) यांनी समुद्रकिनारी केलेले बांधकाम आणि वाळू उत्खनन वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हे बांधकाम अनधिकृत असून, बेकायदेशीरपणे वाळू उपसा केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी रत्नागिरीच्या तहसीलदारांनी आमरे यांना १२ लाख ६५ हजार रुपये दंड का वसूल करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.