Under 19 Cricket World Cup 2024 : नवव्यांदा अंतिम फेरीत पोहोचण्याचे लक्ष्य ; १९ वर्षांखालील विश्‍वकरंडक,भारत-आफ्रिका आज उपांत्य सामना

भारताचा युवा क्रिकेट संघ उद्या १९ वर्षांखालील विश्‍वकरंडकाच्या उपांत्य फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. गतविजेता व सर्वाधिक पाच वेळा विजेता ठरलेला भारतीय क्रिकेट संघ नवव्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी सज्ज आहे
Under 19 Cricket World Cup
Under 19 Cricket World Cupsakal
Updated on

बेनोनी : भारताचा युवा क्रिकेट संघ उद्या १९ वर्षांखालील विश्‍वकरंडकाच्या उपांत्य फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. गतविजेता व सर्वाधिक पाच वेळा विजेता ठरलेला भारतीय क्रिकेट संघ नवव्यांदा स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी सज्ज आहे. यंदाच्या मोसमात एकही लढत न गमावलेल्या भारतीय संघाचे पारडे जड आहे.

भारतीय संघाने साखळी फेरीत तीन, तर सुपरसिक्समध्ये दोन लढतींमध्ये विजय मिळवले आहेत. या पाचही लढतींमध्ये प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात करण्यात त्यांना यश संपादन करता आले आहे. मुशीर खान व उदय सहारन या दोन फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला आहे.

मुशीर याने दोन शतके व एक अर्धशतकासह ३३४ धावा फटकावल्या असून उदय याने एक शतक व दोन अर्धशतकांसह ३०८ धावा फटकावल्या आहेत. सचिन धस याने नेपाळविरुद्धच्या सुपर सिक्स लढतीत ११६ धावांची खेळी साकारत आपली चुणूक दाखवली. गोलंदाजी विभागातही भारतीयांनी प्रभावी कामगिरी केली आहे.

... तर भारत-पाक अंतिम लढत

भारत-पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी यांच्यामध्ये आतापर्यंत या स्पर्धेत लढत झालेली नाही. मात्र जेतेपदाच्या लढतीत हे दोन्ही संघ एकमेकांसमोर येऊ शकणार आहेत. भारताने उपांत्य फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यास आणि पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाचे आव्हान परतवून लावल्यास भारत-पाकिस्तानमध्ये अंतिम सामना होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()