Sachin Dhas : पोलीस अधिकारी असलेल्या आईचा क्रिकेटला का होता विरोध? ...असा घडला बीडचा सचिन

Who is Sachin Dhas Marathi News : आईचा होता विरोध, पण वडिलांनी करून घेतली मेहनत
 Who is Sachin Dhas marathi news
Who is Sachin Dhas marathi newssakal
Updated on

Who is Sachin Dhas News : पोलिस अधिकारी असलेल्या आईला आपल्या मुलाने क्रिकेटमध्ये करिअर करावे असे वाटत नव्हते; परंतु आपल्या मुलामध्ये क्रिकेटची गुणवत्ता किती पटीने चांगली आहे याची जाणीव होती. त्यामुळे या मुलाकडून त्यांनी अर्ध्या खेळपट्टीवरच सराव करून घेतला आणि हाच खेळाडू आता भारतीय युवक संघाचा तारणहार होत आहे. सचिन धस असे बीडमध्ये तयार झालेल्या या खेळाडूचे नाव आहे.

 Who is Sachin Dhas marathi news
Sachin Dhas : बीडच्या सचिनचा 'तो' शॉट अन् चर्चा गुरु लक्ष्मणची, नेटप्रॅक्टिसमध्ये दिले धडे आले कामी...

आफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सचिन कमाल करत आहे. नेपाळविरुद्धच्या सुपरसिक्समधील सामन्यात शतक केल्यानंतर त्याने मंगळवारी झालेल्या उपांत्य सामन्यात भारतीय संघ अडचणीत आलेला असताना शानदार ९६ धावांची खेळी केली. या स्पर्धेत त्याने १०० च्या स्ट्राईक रेटने २९४ धावा केल्या आहेत.

 Who is Sachin Dhas marathi news
Sachin Dhas : सचिन... सचिन... वर्ल्ड सेमीफायनल मध्ये पुन्हा घुमला नारा, काय आहे बीडच्या सुपरस्टारच्या नावामागचं कारण?

बीडमध्ये तुम्हाला अशाच अर्ध्या (११ यार्ड) खेळपट्या मिळतील. सचिन अवघा साडेचार वर्षांचा असल्यापासून आपल्या वडिलांसह येथे यायचा. अगदी आता दक्षिण आफ्रिकेत विश्वकरंडक स्पर्धेस जाण्यापूर्वीही येथे आला होता, असे येथील प्रसिद्ध क्रिकेट प्रशिक्षक शेख अझर यांनी सांगितले. सचिनच्या सुरुवातीच्या काळात शेख यांनी त्याला मार्गदर्शन केले होते. जगदविख्यात सचिन तेंडुलकरच्या नावावरून सचिन असे नाव ठेवण्यात आलेला सचिन विराट कोहलीचा फॅन आहे; परंतु तो सचिन तेंडुलकरची ओळख असलेली १० क्रमांकाची जर्सी घालतो.

सचिन तेंडुलकर यांच्या नावावरून मी माझ्या या मुलाचे नाव सचिन ठेवले. त्याचा जन्म २००५ मधील आहे, असे सचिनचे वडील संजय धस यांनी सांगितले. सचिनचा कोणी खास मित्र नाही, मीच त्याचा मित्र आहे. क्रिकेट आणि क्रिकेट हाच ध्यास असल्यामुळे तो कधी लग्न समारंभ, वाढदिवसाचे समारंभ अशा कार्यक्रमांना जात नाही आणि मीही त्याला जाऊ देत नाही. त्याची आई पोलिस खात्यात असल्यामुळे घरात शिस्त आहे, असे संजय धस म्हणतात.

 Who is Sachin Dhas marathi news
Who is Sachin Dhas : आईने कबड्डी गाजवली मुलगा टीम इंडियामध्ये! बीडच्या सचिनची अंडर-19 आशिया कपला धडक

सचिन धस साधारणतः सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करतो. स्लॉग ओव्हरमध्ये फटकेबाजी करणे याचबरोबर वरच्या क्रमांकावरील फलंदाज लवकर बाद झाले तर डाव सावरणे अशी जबाबदारीही पार पाडतो. कालच्या उपांत्य सामन्यात भारताची ४ बाद ३१ अशी अवस्था झाल्यावर सचिनने डाव सावरलाच, त्याचबरोबर आक्रमक फटकेबाजी करून त्याने विजय आवाक्यात आणला होता.

२०१० मध्ये सचिनची आई सुरेखा या पोलिस खात्यात रुजू झाल्या. आता त्या सहाय्यक पोलिस निरीक्षक आहेत. पोलिस खात्यात असल्यामुळे त्यांना नोकरीत अधिक वेळ द्यावा लागतो. सचिनने क्रिकेटमध्ये कारकीर्द करू नये असे त्यांना वाटत होते, पण माझे मत वेगळे होते. सचिनमधील गुणवत्ता मी हेरली होती, परिणामी त्याच्यावर अधिक मेहनत घेतली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()