मेलबर्न: भारताला २०१२ चा १९ वर्षाखालील वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या उन्मुक्त चंद (Unmukt Chand) बीग बॅश लीग (Big Bash League) स्पर्धेत खेळणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याने आपल्या बीबीएल कारकिर्दिची धडाक्यात सुरुवात केली. उन्मुक्त चंदने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यानंतर त्याला बीबीएलमधील ५४ व्या सामन्यात मेलबर्न रेनेगेड्सचा (Melbourne Renegades) कर्णधार अॅरोन फिंच उन्मुक्त चंदला पदार्पणाची संधी दिली.
उन्मुक्त चंदनेही (Unmukt Chand) फिंचला निराश केले नाही. त्याने सिडनी थंडर विरुद्ध २९ धावांची आक्रमक खेळी केली. यात दोन आकर्षक षटकार आणि एका चौकाराचाही समावेश होता. हा सामना रोमांचक स्थितीत पोहचला होता. सिडनी थंडरने (Sydney Thunder) पहिल्यांदा फलंदाजी करत ८ बाद १७० धावा केल्या. संघाचा कर्णधार उस्मान ख्वाजाने ५१ चेंडूत ७७ धावांची खेळी केली.
सिडनी थंडरने ठेवलेले १७१ धावांचे आव्हान पार करण्यासाठी उतरलेल्या रेनेगेड्सला २० षटकात ७ बाद १६९ धावांपर्यंतच मजल मारता आली. कर्णधार फिंचने (Aaron Finch) ८२ झुंजार खेळी केली. त्याने उन्मुक्त चंद बरोबर तिसऱ्या विकेटसाठी ६८ धावांची दमदार भागीदारीही रचली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.