...म्हणून उन्मुक्त चंदनं घेतला दुसऱ्या देशाकडून खेळण्याचा निर्णय

मी नेहमीच देशासाठी खेळायचे स्वप्न पाहिले. पण...
Unmukt Chand
Unmukt ChandTwitter
Updated on

19 वर्षाखालील भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार उन्मुक्त चंद (Unmukt Chand) याने अचानकपणे निवृत्ती घेतलीये. ट्विटरवरुन संधी शोधत असल्याचा उल्लेख करत बीसीसीआयला अलविदा केल्यानंतर उन्मुक्त चंदचे आणखी एक वक्तव्य समोर आले आहे. निवृत्तीचा निर्णय घेण खूप कठोर होते. पण त्याशिवाय माझ्याकडे कोणताही पर्याय उरला नव्हता असे त्याने एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे.

क्रिकबझला दिलेल्या मुलाखतमध्ये उन्मुत्क चंदने निवृतीचा निर्णयावर सविस्तर भाष्य केले. तो म्हणाला की, "माझ्या सारख्या खेळाडूसाठी निवृत्तीचा निर्णय घेणं सोप नव्हते. मी नेहमीच देशासाठी खेळायचे स्वप्न पाहिले. सिनियर टीमशिवाय अन्य क्रिकेट खेळल्यानंतर हा निर्णय घेताना भावूक होतो. मागील काही वर्षांत असोसिएशनच्या पॉलिटिक्सचा सामना करावा लागला, असा धक्कादायक खुलासाही त्याने केलाय. अंतर्गत राजकारणामुळे मी अधिक क्रिकेट खेळू शकलो नाही. आता मी अमेरिकेत क्रिकेट खेळवण्याचे ठरवले आहे. सध्याच्या घडीला मी ज्या ठिकाणी आहे त्यासाठी बीसीसीआयाचे आभार मानतो," असेही तो या मुलाखतीममध्ये म्हणाला.

Unmukt Chand
IND vs ENG Test Day 2 : अखेरचं सत्र भारताचं, पण रुट खेळतोय मस्त

तो पुढे म्हणाला की, दिल्लीकडून वर्षभरात एकही सामना खेळायला न मिळाल्याने हा निर्णय घ्यावा लागला. ज्यावेळी काही खेळाडूंमध्ये प्रतिभा नसतानाही ते तुमच्या पुढे निघून जातात त्यावेळी कोणीतरी आपल्याला थप्पड मारल्यासारखे वाटते. डीडीसीएकडून कोणत्याही गोष्टीला पाठिंबा मिळाला नाही. कोणतीही चूक नसताना संघाबाहेर रहावे लागले, असेही त्याने म्हटले आहे.

Unmukt Chand
संधी न मिळाल्याने २८व्या वर्षी खेळाडूचा भारतीय क्रिकेटला रामराम

उन्मुक्त चंदने 2012 मध्ये 19 वर्षांखालील संघाचे नेतृत्व करताना भारताला जेतेपद मिळवून दिले होते. फायनल मॅचमध्ये त्याने 111 धावांची नाबाद खेळी केली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करत ट्रॉफीवर नाव कोरले होते. आयपीएलमध्येही तो खेळताना दिसला. पण त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. तो ज्यावेळी अमेरिकेला गेला होता तेव्हापासूनच त्याच्या नावाची चर्चा रंगली होती. अखेर तो अमेरिकेकडून खेळणार असल्याचे आता पक्के झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.