T20 World Cup : ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अमेरिकेतील सामने ‘नाकापेक्षा मोती जड’; दोन पदाधिकाऱ्यांचे राजिनामे

वाढीव खर्च आणि नासाऊ स्टेडियमधील खेळपट्ट्यांवरून टीका होत आहे. आयसीसीची वार्षिक परिषद १९ तारखेला कोलंबोत होत आहे, त्याअगोदर दोन पदाधिकाऱ्यांनी राजिनामे दिले आहेत.
US matches T20 World Cup cricket tournament exceeded  expenses 
 resignation of two office bearers
US matches T20 World Cup cricket tournament exceeded expenses resignation of two office bearersSakal
Updated on

दुबई : ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अमेरिकेत खेळवण्यात आलेले सामने नाकापेक्षा मोती जड झाल्याचे दिसून येऊ लागले आहे. वाढीव खर्च आणि नासाऊ स्टेडियमधील खेळपट्ट्यांवरून टीका होत आहे. आयसीसीची वार्षिक परिषद १९ तारखेला कोलंबोत होत आहे, त्याअगोदर दोन पदाधिकाऱ्यांनी राजिनामे दिले आहेत.

ख्रिस टेटली आणि क्लेअर फरलाँग हे ते राजिनामे देणारे पदाधिकारी आहेत. यातील टेटली अमेरिकेतील सामने आयोजनाचे प्रमुख होते तर फरलाँग यांच्यावर मार्केटिंग आणि कम्युनिकेशन सरव्यवस्थापकाची जबाबदारी होती.

ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा नुकतीच संपली आहे आणि आयसीसीची बैठक होण्याच्या काही दिवस अगोदर ही महत्त्वाची घडामोड घडली आहे. विश्वकरंडक स्पर्धेतील अमेरिकेत झालेल्या सामन्यांच्या आयोजनाशी याचा संबंध असल्याची चर्चा आहे.

अमेरिका खंडात क्रिकेटचा प्रसार व्हावा, या महत्त्वाकांक्षी विचाराने आयसीसीने या विश्वकरंडक स्पर्धेतील काही सामने अमेरिकेत खेळवण्याचा निर्णय घेतला; पण खर्चाच्या दृष्टीने तो नाकापेक्षा मोती जड झाल्याचे आता स्पष्ट होत आहे. अजून जमा खर्चाचा हिशेब तयार व्हायचा आहे, त्यामुळे नक्की किती नुकसान झाले हे आकडेवारीत सांगता येणार नाही; पण तिकीटविक्रीतून मोठा तोटा झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे नुकसान लाखो डॉलरमध्ये असेल, असा प्राथमिक अंदाज आहे.

अमेरिकेतील सामने आयोजनाची मुख्य जबाबदारी असलेल्या टेटली यांनी स्पर्धा सुरू होण्याअगोदरच आपला राजीनामा दिला होता, असेही सांगण्यात येत आहे. बहुतांशी सदस्य टेटली यांच्या एकूणच कार्यशैलीवर नाराज आहेत; परंतु अमेरिकेतील सामन्यांच्या आयोजनाचा त्याच्याशी संबंध नाही, असेही म्हटले जात आहे.

न्यूयॉर्कमधील सामन्यांसाठी नासाऊ कौंटी क्रिकेट मैदान तयार करण्यात आले. वास्तविक आणखी शहरात क्रिकेटची मैदाने तयार होती; परंतु नासाऊ मैदान तयार करण्याचा घाट घालण्यात आला. ड्रॉपइन खेळपट्ट्यांवरून बरेच वाद झाले. धावा करणे जवळपास प्रत्येक फलंदाजाला कठीण जात होते. मैदानावरही चेंडू कमी-अधिक प्रमाणात उडत होते.

सामने संपल्यानंतर नासाऊ स्टेडियम लगेचच पाडण्यात आले. स्पर्धेतील एकूण १६ सामने अमेरिकेत झाले, त्यातील आठ सामने नासाऊ स्टेडियमवर होते. विशेष म्हणजे, भारताचे तीनही साखळी सामने याच मैदानावर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.