T20 World Cup : 'टी-20 वर्ल्डकपचे सहयजमानपद हिरावू नका, पुढील वर्षीपर्यंत तयारी पूर्ण करू; USAचा दावा

T20 World Cup
T20 World Cup
Updated on

T20 World Cup USA : पुढील वर्षी ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धा संयुक्तपणे वेस्ट इंडीज आणि अमेरिकेत होणार आहे; परंतु आपल्याकडे अव्वल दर्जाचे क्रिकेट स्टेडियम नसल्यामुळे यजमानपदातून आपल्याला दूर केले जाईल, अशी भीती अमेरिका क्रिकेट संघटनेला वाटत आहे; परंतु मेजर क्रिकेट लीगचे यशस्वीपणे आयोजन करून आम्ही हा संभ्रम दूर करू, असे अमेरिका क्रिकेट संघटनेने स्पष्ट केले आहे.

T20 World Cup
WTC Final 2023 VIDEO: लाइव्ह मॅचमध्ये रोहित शर्माने पार्टनरला केली शिवीगाळ, व्हिडिओ व्हायरल

अमेरिकेत होणारे सामने इतर ठिकाणी खेळवण्याचा विचार आयसीसी करत असल्याचे वृत्त प्रसिद्ध होत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका क्रिकेट संघटना जागरूक झाली आहे; परंतु आयसीसीकडून आपल्याकडे असे कोणतेही संकेत मिळालेला नाही किंवा कळवलेलेही नाही, असे अमेरिका क्रिकेट संघटनेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

विश्वकरंडक ट्वेन्टी-२० आयसीसीकडून आम्ही या संदर्भात काहीही ऐकलेले नाही, त्यामुळे आम्ही या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी कोठेही कमतरता ठेवणार नाही, आवश्यक असलेल्या सर्व सुविधा आम्ही तयार करणार असल्याचा विश्वास या अधिकाऱ्याने व्यक्त केला.

T20 World Cup
Wrestlers Protest : 'रागाच्या भरात...' अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांचा UTurn 'त्या' वक्तव्याने प्रकरणात नवा ट्विस्ट

अमेरिकेत क्रिकेटचे सामने सातत्याने होत नसतात, त्यामुळे केवळ क्रिकेटसाठी वापरण्यात येणारी स्टेडियम नाहीत. इतर खेळांच्या मैदानावर क्रिकेटचे सामने खेळवले जातात. तरीही आम्ही मेजर लीग टी-२० स्पर्धा आयोजित करणार आहोत आणि ती यशस्वीपणे पार पाडू, असा विश्वास या अधिकाऱ्याने व्यक्त केला. ही मेजर लीग टी-२० स्पर्धा १३ ते ३० जुलै दरम्यान होत आहे. या स्पर्धेत इंग्लंडचा स्टार खेळाडू जेसन रॉय, ऑस्ट्रेलियाचे अॅडम झॅम्पा, मॅथ्यू वेड, मार्कस स्टॉयनिस, मोझिस हेन्रिक्स असे खेळाडू खेळणार आहेत.

लॉडेनहील (फ्लोरिडा) येथे आम्ही भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील सामने आयोजित करून तेथील सुविधांची चाचणी अगोदरच केलेली आहे. त्यामुळे इतर ठिकाणीही कशा सुविधा करायला हव्यात याचा अंदाज आम्हाला आला आहे. येत्या काही महिन्यांत आम्ही सर्व ठिकाणी असे बदल करू, असेही अमेरिका क्रिकेट संघटनेच्या या पदाधिकाऱ्याने सांगितले.

पुढील वर्षी होत असलेल्या टी-२० विश्वकरंडक स्पर्धेतील सामन्यांसठी ओकलँड, फ्लोरिडा आणि लॉस एंजलिस ही ठिकाणे निश्चित करण्यात आली आहे. वेस्ट इंडीजही सहयजमान असले तरी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायप्रोफाईल सामना अमेरिकेतच खेळवला जाईल, असे सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.