Team India : टीम इंडियाच्या कर्णधारामुळं संपलं भविष्यात सुपरस्टार बनू शकणाऱ्या खेळाडूचं करियर?

'मी त्याचा जवळही नाही, जर तिथे पोहोचायचे असेल तर...', हार्दिकचा पर्याय असणारा खेळाडूचं भाष्य
hardik-pandya
hardik-pandyasakal
Updated on

Team India : टीम इंडियाचा डॅशिंग अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे टी-20 वर्ल्ड कप 2021 नंतर बराच काळ मैदानाबाहेर होता. पण तो आता संघाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू बनला आहे. 2022 च्या टी-20 विश्वचषकानंतर तो टी-20 संघाची कमानही सांभाळत आहे.

पांड्याच्या शानदार खेळामुळे भविष्यात सुपरस्टार युवा अष्टपैलू खेळाडू संघात पुनरागमन करू शकलेला नाही. 2021च्या टी-20 विश्वचषकानंतर हा खेळाडू पांड्याचा बदली खेळाडू मानला जात होता.

hardik-pandya
NZ vs SL ODI : मैदानातील अंपायर झोपेत! ODI सामन्यात गोलंदाजाने टाकली 11 षटके, अन्...

टी-20 विश्वचषक 2021 नंतर हार्दिक पांड्याच्या जागी व्यंकटेश अय्यर टीम इंडियाची पहिली पसंती बनला होता. मात्र आता व्यंकटेश अय्यरला संघात स्थान नाही. व्यंकटेश अय्यरने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात पदार्पण केले, पण हार्दिक पांड्या संघात आल्यापासून त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या व्यंकटेश अय्यरने या मोसमात चांगली कामगिरी केली. 14 डावात फलंदाजी करताना त्याने 28.86 च्या सरासरीने आणि 145.85 च्या स्ट्राईक रेटने 404 धावा केल्या. भारतीय संघात स्थान का मिळत नाही, याचा खुलासा अय्यरने नुकताच केला.

hardik-pandya
Team India : भारतीय क्रिकेटसाठी दिवाळीत बीसीसीआयचं मोठं प्लॅनिंग! जय शहा म्हणाले...

स्पोर्टकीडाशी बोलताना अय्यर म्हणाला, 'हार्दिक पांड्याकडे कौशल्य आहे, जर मला भारतीय संघात स्थान मिळवायचे असेल, तर मला हार्दिक सारखे चांगले खेळावे लागेल ज्याच्या मी सध्या जवळही नाही. ही वस्तुस्थिती आहे आणि मी मेहनत घेत आहे.

व्यंकटेश अय्यरने भारतीय संघासाठी 9 टी-20 सामन्यात 133 धावा केल्या आहेत. 5 बळी घेतले आहेत. त्याचबरोबर त्याने टीम इंडियासाठी 2 टी-20 सामनेही खेळले आहेत. वेंकटेश अय्यरची आयपीएल 2022 नंतर दक्षिण आफ्रिका मालिका आणि आयर्लंड मालिकेसाठी टीम इंडियाच्या संघात निवड झाली होती, परंतु त्याला एकदाही प्लेइंग 11 मध्ये स्थान देण्यात आले नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.