भारतीय वरिष्ठ क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. त्याचवेळी 24 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान देशांतर्गत क्रिकेटमध्ये देवधर ट्रॉफीचे आयोजन करण्यात येणार आहे. आयपीएल 2023 मध्ये आपल्या फलंदाजीने छाप पाडणाऱ्या रिंकू सिंगचा वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला नव्हता, मात्र आता देवधर ट्रॉफीसाठी मध्य विभागीय संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे.
आता असा एक खेळाडू आहे ज्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तो फेब्रुवारी 2022 पासून टीम इंडियातून बाहेर आहे. आता त्याच्याकडे भारताच्या देशांतर्गत एकदिवसीय स्पर्धेत संघाची कमान सोपवण्यात आली आहे. व्यंकटेश अय्यरबद्दल बोलले जात आहे, त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेसाठी कोणत्याही फॉरमॅटमध्ये स्थान देण्यात आलेले नाही.
मात्र, बीसीसीआयच्या निवड समितीने व्यंकटेशवर विश्वास ठेवला आणि त्याच्याकडे मध्य विभागीय संघाचे कर्णधारपद सोपवले. देवधर ट्रॉफी-2023 या देशांतर्गत वनडे स्पर्धेसाठी तो सेंट्रल झोन संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे रिंकू आणि तो दोघेही आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे प्रतिनिधित्व करतात.
व्यंकटेश अय्यरने आतापर्यंत भारतासाठी 11 सामने खेळले आहेत. यामध्ये 2 वनडे आणि 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा समावेश होतो. यादरम्यान तो स्वत:ला सिद्ध करू शकला नाही. त्याने 2 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 24 धावा केल्या आणि 9 टी-20 सामन्यांच्या 7 डावात केवळ 133 धावा केल्या.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला एकही विकेट मिळालेली नाही, तर आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये त्याने 5 विकेट घेतल्या होत्या. त्याने फेब्रुवारी 2022 मध्ये धर्मशाला येथे श्रीलंकेविरुद्ध भारताकडून शेवटचा टी-20 सामना खेळला होता.
देवधर करंडक स्पर्धेसाठी सेंट्रल झोन संघ : माधव कौशिक, शिवम चौधरी, यश दुबे, यश कोठारी, व्यंकटेश अय्यर (कर्णधार), रिंकू सिंग, आर्यन जुयाल, उपेंद्र यादव, कर्ण शर्मा, यश ठाकूर, आदित्य सरवटे, अनिकेत चौधरी, आकाश मधवाल, मोहनराजे. खान आणि शिवम मावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.