Ishan Kishan Venkatesh Prasad : नुसतं गिल गिल करताय... व्यंकटेश प्रसादने राहितचे उपटले कान

Ishan Kishan IND vs SL 1st ODI
Ishan Kishan IND vs SL 1st ODI esakal
Updated on

Ishan Kishan IND vs SL 1st ODI : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात भारताने निवडलेल्या संघावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्माने पहिल्या वनडे सामन्यात इशान किशनच्या ऐवजी शुभमन गिलला संधी दिली. याचबरोबर मधल्या फळीत केएल राहुलला संधी देत सूर्यकुमार यादवला बेंचवर बसवले. या निर्णयानंतर भारताचा माजी खेळाडू आणि प्रशिक्षक व्यंकटेश प्रसाद जाम भडला. त्याने ट्विट करत रोहित शर्माच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

Ishan Kishan IND vs SL 1st ODI
IND vs SL 1st ODI : कर्णधार शानकाने शतकी खेळी करत भारताचा विजय लांबला 50 व्या षटकापर्यंत

व्यंकटेश प्रसादने रोहित शर्माच्या वक्तव्यावर ट्विट केले की, 'तूम्ही निःपक्षपातीपणे विचार करा की गेल्या वनडे सामन्यात भारताकडून ज्याने द्विशतक ठोकले आहे त्याला संधी द्यायला हवी की नाही. त्याने मालिकेतील दोन सामने गमावल्यानंतर ही खेळी करत भारताला जिंकून दिले होते. तुम्ही प्रत्येकवेळी गिलबाबत बोलताय. मात्र तुम्ही द्विशतक ठोकलेल्या खेळाडूला बाहेर बसवू शकत नाही.'

Ishan Kishan IND vs SL 1st ODI
IND vs SL : सूर्याला वगळलं! केएल राहुलला संघात बसवण्यासाठी दोघांवर झाला अन्याय

इशान किशनबाबत रोहित शर्माने पत्रकार परिषदेत सांगितले होते की, 'इशान किशनने गेल्या सामन्यात दमदार खेळी केली होती. मात्र श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात माझ्यासोबत शुभमन गिल डावाची सुरूवात करेल.' भारतीय संघात प्लेईंग 11 मध्ये जागा मिळवण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. दरम्यान, शुभमन गिलने पहिल्या वनडे सामन्यात 51 चेंडूत नाबाद अर्धशतक ठोकले. त्याने रोहितच्या साथीने नाबाद शतकी सलामी दिली. तो 60 चेंडूत 70 धावा करून बाद झाला. (Sports Latest News)

Ishan Kishan IND vs SL 1st ODI
IND vs SL ODI: रोहितने घेतला कठोर निर्णय! 'या' खेळाडूचे करियर वाचवण्यासाठी दिला मोठा बळी

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या सामन्यासाठी संघा जाहीर केला त्यावेळी सूर्यकुमार यादवला संघात स्थान न दिल्याबद्दल सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसला. सूर्यकुमार यादवने नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरूद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात 112 धावांची नाबाद शतकी खेळी केली होती. मात्र तरी देखील त्याला संधी देण्यात आलेली नाही.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.