Bapusaheb Rade : कुस्ती विश्वावर शोककळा! मुकी कुस्ती बोलकी करणाऱ्या ज्येष्ठ निवेदकाचं निधन

कुस्तीतील डावपेचांचे अचूक वर्णन व पैलवानांची सविस्तर माहिती देण्यात त्यांचे कौशल्य होते.
Kusti
KustiEsakal
Updated on
Summary

कुस्तीचा निवेदक म्हणून त्यांनी राजर्षी शाहू खासबाग मैदानातून (Rajarshi Shahu Khasbag Maidan) सुरवात केली.

कोल्हापूर : ‘पैलवानांनी कुस्ती (Wrestling) करायची हाय,’ असे ठणकावून सांगणारे ज्येष्ठ कुस्ती निवेदक बापूसाहेब ज्ञानदेव राडे (वय ८७, राहणार शनिवार पेठ) यांचे निधन झाले. ‘मुकी कुस्ती बोलकी करणारा निवेदक,’ अशी त्यांची ख्याती होती.

त्यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. श्री. राडे (Bapusaheb Rade) यांचे मूळ गाव अमणापूर (ता. पलूस, जि. सांगली). त्यांचे वडील व दोन भाऊ पैलवान होते. गावात तालीम असल्याने, तेथे त्यांनी कुस्तीचे धडे गिरवण्यास सुरवात केली. त्यानंतर त्यांनी कोल्हापुरातील काळाईमाम तालमीत कुस्तीचा सराव केला.

Kusti
Kagal Politics : कागलमध्ये हाय व्होल्टेज लढत, ती कशी हे मी आत्ताच सांगणार नाही; महाडिकांचं सूचक वक्तव्य

प्रायव्हेट हायस्कूलमधून त्यांचे शालेय शिक्षण झाले. सीपीएड्. नंतर त्यांनी एनआयएसचा अभ्यासक्रम पूर्ण केला. कोल्हापूर व रत्नागिरी येथे क्रीडाधिकारी म्हणून काम केले. कुस्तीचा निवेदक म्हणून त्यांनी राजर्षी शाहू खासबाग मैदानातून (Rajarshi Shahu Khasbag Maidan) सुरवात केली.

Kusti
Satara : लोकसभेसाठी भाजपची रणनिती ठरली; बालेकिल्ल्यातच NCP चा होणार करेक्ट कार्यक्रम, फडणवीसांकडं कमान!

कुस्तीतील डावपेचांचे अचूक वर्णन व पैलवानांची सविस्तर माहिती देण्यात त्यांचे कौशल्य होते. त्याला कुस्ती शौकिनांची टाळ्यांच्या कडकडाटात दाद मिळायची. कुस्तीच्या वर्णनातून शौकिनांच्या अंगावर रोमांच उभे करण्यात ते माहीर होते. कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.

Kusti
Siddheshwar Factory : चिमणी पाडून वाटोळं करायचं होतं, त्यांनी ते केलं, पण..; सुशीलकुमार शिंदेंचा कोणावर निशाणा?

‘मी त्यांना १९७१ पासून कुस्तीचे निवेदन करताना पाहिले आहे. ते १९९५ पर्यंत निवेदन करत होते. अनेक गावांतून त्यांना त्यासाठी बोलावले जायचे. मुकी कुस्ती बोलकी करणारा हा अवलिया होता. ज्या गावात कुस्ती तेथे ते त्यांच्या स्कूटरवरून जात होते. संयोजकांनी दिलेल्या मानधनाच्या पैशातून गाडीत पेट्रोल भरायचे. उरलेले पैसे संयोजकांना परत द्यायचे. कुस्तीविषयी कमालीची निष्ठा असणारा हा माणूस होता.

- दीनानाथसिंह, हिंदकेसरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.