भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. तो संघाबाहेर असला तरी चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ कमी झालेली नाही. त्यामागील कारण म्हणजे हार्दिक पांड्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर असला तरी सोशल मीडियावर तो चांगलाच सक्रिय आहे. इन्स्टाग्राम पोस्ट, ट्विटवरील टिवटिवाट आणि फेसबुकवरील पोस्टमुळे तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. यावेळी त्याने 'पुष्पा' चित्रपटातील एका गाण्यावर आपल्या आजीसोबत डान्स करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. (Hardik Pandya Dance on Pushpa Movie Song)
'पुष्पा' चित्रपट रिलीज झाल्यापासून यातील गाणे भारतासह जगभरात धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांचा अभिनय लोकांना चांगलाच भावला आहे. सामान्य लोकांसोबतच 'पुष्पा'ची क्रेझ सेलिब्रिटींमध्येही पाहायला मिळते. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजानं पुष्पामधील लूक शेअर करुन सर्वांचे मनोरंजन केले होते.
'पुष्पा'च्या गाण्यावर डान्स
हार्दिक पांड्याने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो आजीसोबत श्रीवल्ली गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये हार्दिक पांड्या आणि त्याची आजीही गाण्याची हुक स्टेप करताना दिसत आहेत. व्हिडिओ शेअर करताना हार्दिकने लिहिले की, 'आमच्या पुष्पा नानी'. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर हार्दिकच्या चाहत्यांनी जोरदार कमेंट्स केल्या आहेत. याशिवाय क्रिकेट आणि फिल्म स्टार्सही हार्दिक पांड्याच्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट करत आहेत.
हार्दिक पांड्याला आजीसोबत डान्स करताना पाहून 'पुष्पा'चा नायक अल्लू अर्जुनही स्वत:ला कमेंट करण्यापासून रोखू शकला नाही. व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याने कमेंट केली आहे. 'खूप क्यूट हृदयस्पर्शी नृत्य. अशा शब्दांत अल्लू अर्जुनने हार्दिक पांड्याला दाद दिलीये.
हार्दिक पांड्याचा व्हिडिओ व्हिडिओ अल्पावधीतच तुफान लोकप्रिय होताना दिसतोय. आतापर्यंत 8 दशलक्ष लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून 20 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
हार्दिक आयपीएल 2022 मध्ये अहमदाबादचे नेतृत्व करणार
आयपीएलमधील नवी फ्रँचायझी अहमदाबादने हार्दिक पांड्याला आपल्या संघाचा कर्णधार केले आहे. त्याचबरोबर शुभमन गिल आणि राशिद खान हे देखील त्याच्यासोबत संघात आहेत. अहमदाबादच्या संघाने हार्दिकसाठी 15 कोटी मोजले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.