Video: कैफने केला 'नागिन डान्स'; सेहवागला दिलेला शब्द पाळला!
वाचा, कैफला का करावा लागला नागिन डान्स
Ind vs Eng Test: इंग्लंडविरूद्धच्या चौथ्या कसोटी (4th Test) सामन्यात भारतीय संघाने (Team India) यजमानांना धूळ चारली. भारताने १५७ धावांनी सामना जिंकत मालिकेत २-१ची अजिंक्य आघाडी घेतली. भारताकडून रोहित शर्माने (Rohit Sharma) दमदार शतक ठोकले. पण शार्दूलचा (Shardul Thakur) नेटकऱ्यांनी जयजयकार केला. दोन्ही डावात शार्दूलने दमदार अर्धशतके ठोकली. त्याचसोबत दुसऱ्या डावात अतिमहत्त्वाची अशी कर्णधार जो रूटची (Joe Root) दांडी गुल करत भारताच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. या विजयानंतर माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याचा नागिन डान्स व्हिडाओ व्हायरल झाला आहे.
भारत-इंग्लंड चौथ्या कसोटी सामन्यामध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद कैफ हे दोघे कॉमेंट्री बॉक्समध्ये सामन्याचे समालोचन करत होते. त्यावेळी एका चाहत्याने ट्वीट करून नागिन डान्सचा विषय काढला होता. त्यावेळी सेहवागने मोहम्मद कैफ याला नागिन डान्स करण्यास सांगितलं होतं. त्यावर, भारत जर चौथी कसोटी जिंकला तर मी नक्की नागिन डान्स करेन आणि माझ्या इन्स्टाग्रामवर शेअर करेन असा शब्द कैफने दिला होता. त्यानुसार, भारताच्या विजयानंतर त्याने शब्द पाळला आणि आपला नागिन डान्सचा व्हिडीओ पोस्ट केला.
दरम्यान, या चौथ्या सामन्यात आणखी एक जण चर्चेत राहिला. त्या खेळाडूचं नाव म्हणजे, शार्दूल ठाकूर. शार्दूल ठाकूरने दोन्ही डावात भारतीय फलंदाजीला दिशा दिली. ७ बाद १२७ वर भारतीय संघ असताना त्याने पहिल्या डावात ३६ चेंडूत ५७ धावा कुटल्या. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर भारताने १९१ धावा केल्या. त्यानंतर दुसऱ्या डावातही त्याने ६० धावांची खेळी केली. तसेच, सामन्यात दोन्ही डावात मिळून त्याने ३ महत्त्वपूर्ण बळी टिपले. पहिल्या डावात त्याने सर्वाधिक ८१ धावांची खेळी करणाऱ्या ओली पोपला बाद केले. तर दुसऱ्या डावात शतकी सलामी तोडण्यासाठी शार्दूलचा उपयोग झाला. तसेच, सर्वोत्तम लयीत असलेल्या जो रूटलाही शार्दूलने बाद केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.