Serbian athlete Lazar Đukić is disappearing - टेक्सासमधील फोर्ट वर्थ मरीन क्रीक लेक येथे एक धक्कादायक घटना घडली. 2024 CrossFit Games मधील ८०० मीटर पोहोण्याच्या शर्यतीत एक खेळाडू अचानक पाण्यात गायब झाला. फिनिश लाईनपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर असताना हा खेळाडू पाण्यात गायब झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हायरल व्हिडीओनुसार सर्बियन खेळाडू लाझार ड्युकिच अंतिम रेषेच्या अगदी जवळ आलेला असताना अचानक पाण्याखाली गायब झाल्याचे दिसत आहे. ही घटना गुरुवारी सकाळी ८ वाजता घडली आणि त्यानंतर आयोजकांनी त्या खेळाडूची शोधाशोध सुरू केली. दोन तासांनंतर पाण्यातून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला. पण, हा मृतदेह हा सर्बियन खेळाडूचा आहे, याची पुष्टी करण्यात आलेली नाही. पण, क्रॉसफिट गेम्सच्या समितीने एका निवेदनात सर्बियन ॲथलीटचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे.
"२०२४ क्रॉसफिट गेम्समध्ये वैयक्तिक इव्हेंट एकच्या जलतरण स्पर्धेदरम्यान स्पर्धकाच्या मृत्यूमुळे क्रॉसफिटला खूप दुःख झाले आहे," असे निवेदनात म्हटले आहे. "आम्ही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत आणि यावेळी सर्बियन खेळाडूच्या कुटुंबाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वकाही करत आहोत," असेही निवेदनात म्हटले आहे.
टेलीग्रामच्या वृत्तात म्हटले आहे की, अग्निशामक युनिट्सला सकाळी ८ च्या सुमारास तलावात खेळाडू बुडण्याच्या संभाव्य वृत्ताचा कॉल आला आणि त्यांनी लगेचच प्रतिसाद दिला. या दु:खद बातमीमुळे दिवसासाठी नियोजित पुढील कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत.
ड्युकिच अनेक वर्षांपासून क्रॉसफिट गेम्समध्ये नियमित स्पर्धक होता. पुरुष गटात तो जागतिक क्रमवारीत ८८व्या, तर सर्बियात तिसऱ्या क्रमांकावर होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.