Vijay Hazare Karandak : विश्वकरंडकानंतर आता देशांतर्गत एकदिवसीय क्रिकेट

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अगोदरचे सर्व सामने जिंकूनही अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाला नमविणे शक्य झाले नाही.
cricket
cricketsakal
Updated on

मुंबई - विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अगोदरचे सर्व सामने जिंकूनही अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाला नमविणे शक्य झाले नाही. या पार्श्वभूमीवर आता गुरुवारपासून (ता. २३) देशांतर्गत क्रिकेटमध्ये एकदिवसीय सामन्यांतील चुरस अनुभवायला मिळेल.

विजय हजारे करंडक एकदिवसीय सामने गुरुवारपासून सुरू होत असून ३८ संघांत चढाओढ असेल. साखळी फेरी सामने पाच केंद्रांवर होणार असून नंतर बाद फेरी राजकोट येथे खेळली जाईल. गतमोसमात सौराष्ट्रने अंतिम लढतीत महाराष्ट्राला हरवून प्रतिष्ठेचा विजय हजारे करंडक जिंकला होता.

साखळी फेरी सामने २३ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत बंगळूर, जयपूर, अहमदाबाद, चंडीगड व मुंबई येथे खेळले जातील. पाचही गटातील पहिले दोन संघ बाद फेरीत दाखल होतील. ९ ते १६ डिसेंबर या कालावधीत राजकोट येथे बाद फेरी सामने होतील.

प्रमुख खेळाडू अनुपलब्ध

भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील ‘टी-२०’ क्रिकेट मालिका २३ नोव्हेंबर ते तीन डिसेंबर या कालावधीत होत आहे. या मालिकेसाठी निवड झालेले प्रमुख खेळाडू विजय हजारे करंडक स्पर्धेच्या साखळी फेरीत खेळू शकणार नाहीत. महाराष्ट्राला ऋतुराज गायकवाडची अनुपस्थिती जाणवेल.

नवोदित चेहऱ्यांना संधी

पुढील महिन्यात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचा लिलाव नियोजित आहे. त्यामुळे विजय हजारे करंडक स्पर्धेत चमकदार कामगिरी बजावण्यासाठी नवोदित खेळाडू प्रयत्नशील असतील. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ‘टी-२०’ मालिकेसाठी निवड न झालेला संजू सॅमसन पुनरागमनासाठी दावेदार आहे, तो केरळचे नेतृत्व करत आहे. आसामचा युवा खेळाडू रियान पराग याचा फॉर्म आणि त्याच्या कामगिरीकडे निवड समितीचे लक्ष असेल.

स्पर्धेतील संघ व गट

अ गट (बंगळूर येथे) - सौराष्ट्र, केरळ, मुंबई, रेल्वे, त्रिपुरा, पुद्दुचेरी, ओडिशा, सिक्कीम.

ब गट (जयपूर येथे) - महाराष्ट्र, झारखंड, हैदराबाद, छत्तीसगड, विदर्भ, सेनादल, मेघालय, मणिपूर

क गट (अहमदाबाद येथे) - कर्नाटक, जम्मू-काश्मीर, चंडीगड, हरियाना, दिल्ली, उत्तराखंड, बिहार, मिझोराम.

ड गट (चंडीगड येथे) - आसाम, उत्तर प्रदेश, आंध्र, राजस्थान, गुजरात, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश.

ई गट (मुंबईत) - पंजाब, तमिळनाडू, मध्य प्रदेश, बंगाल, बडोदा, गोवा, नागालँड.

मुंबईसाठी सोपी सलामी

मुंबईचा संघ अनुभवी अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरत आहे. सलामीची लढत त्यांच्यासाठी सोपी आहे. गुरुवारी बंगळूर येथे सिक्कीमविरुद्ध मुंबईचा पहिला सामना होईल. गतउपविजेत्या महाराष्ट्रासमोर पहिल्या लढतीत जयपूर येथे झारखंडचे आव्हान असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.