विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy 2021 22) स्पर्धेनं भारतातील देशांतर्गत स्पर्धेला सुरुवात होत आहे. 8 डिसेंबरपासून रंगणाऱ्या स्पर्धेतील अंतिम सामना 27 डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे. गत हंगामात मुंबईने (Mumbai ) चौथ्यांदा या स्पर्धेचं जेतेपद मिळवले होते. तामिळनाडू संघाने (Tamil Nadu) विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकण्याचा पराक्रम करुन दाखवलाय. त्यांनी पाच वेळा जेतेपद पटकावले आहे.
या स्पर्धेत 38 संघ सहा वेगवेगळ्या ग्रुपमध्ये खेळताना दिसेल. पाच एलिट ग्रुप आणि एक प्लेट ग्रुप अशी वर्गवारी करण्यात आलीये. मुंबई, गुवाहटी, तिरुवनंतपुरम, चंदीगड, राजकोट, रांची आणि जयपूर या सात ठिकाणी या स्पर्धेतील सामने खेळवण्यात येतील.
Elite A आंध्र प्रदेश, ओडिसा, गुजरात, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, विदर्भ. (या संघाचे सामने मुंबई आणि गुवाहटी या ठिकाणी रंगणार)
Elite B : मुंबई, तमिळनाडू, कर्नाटक, बडोदा, बंगाल पुद्दुचेरी. (या गटातील सामने तिरुवनंतपुरममध्ये खेळवण्यात येतील)
Elite C : दिल्ली, झारखंड, हरयाणा, हैदराबाद, सौराष्ट्र, उत्तर प्रदेश. (या गटातील सामने चंदीगडमध्ये खेळवण्यात येतील):
Elite D मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छतीसगड, उत्तराखंड, केरळ, चंदीगड (राजकोटमध्ये रंगणार सामने)
Elite E : आसाम, गोवा, पंजाब, रेल्वे, राजस्थान, सर्विसेस (रांचीच्या मैदानात रंगणार सामने)
Plate Group : त्रिपूरा, नागालँड, मेघालय, मनिपूर, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, बिहार. (सर्व सामने जयपूरमध्ये खेळवण्यात)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.