Vijay Hazare Trophy Ruturaj Gaikwad :
महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीत शतकांचा पाऊस पाडणे सुरूच ठेवले आहे. त्याने क्वार्टर फायलनमध्ये उत्तर प्रदेशविरूद्ध नाबाद 220 धावांची द्विशतकी खेळी केली होती. त्यानंतर सेमी फायलमध्ये आसामविरूद्ध 168 धावांची खेळी केली होती. आता फायलनमध्ये सौराष्ट्रविरूद्ध ऋतुराज गायकवाडने 108 धावांची शतकी खेळी करत महाराष्ट्राला चांगली धावसंख्या उभारून देण्याचा प्रयत्न केला.
विजय हजारे ट्रॉफी 2022 च्या फायनलमध्ये सौराष्ट्रने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर सकाळी फलंदाजीसाठी उतरलेल्या महाराष्ट्राने संथ सुरूवात केली. पवन जैन धावबाद झाल्यानंतर सलामीवीर आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडने एक बाजू लावून धरली होती. त्याने सत्यजीत बच्छावसोबत भागीदारी रचण्यास सुरूवात केली. मात्र सत्यजीत 27 धावांची भर घालून परतल्यानंतर ऋतुराजने डावाची सूत्रे आपल्या हातात घेत आक्रमक खेळी करण्यास सुरूवात केली. तो बघता बघता आपल्या शतकाजवळ पोहचला. त्याने षटकार मारत आपले शतक पूर्ण केले.
मात्र शतकानंतर ऋतुराज गायकवाड 108 धावा करून धावबाद झाला. दरम्यान, ऋतुराजच्या शतकी खेळीच्या जोरावर महाराष्ट्राने 200 धावा पार केल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.