भारतीय संघात (Team India) सध्याच्या घडीला बदलाचे वारे वाहू लागले आहेत. टी-20 आणि एकदिवसीय संघातील नेतृत्वाची खांदे पालट आणि प्रशिक्षकपदी राहुल द्रविड आल्यानंतर युवा खेळाडूंसाठी संघाचे दरवाजे खुले होणार आहेत. ऐकाकाळी भारतीय संघाचा हुकमी एक्का असलेला हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पाठिच्या दुखापतीमुळे अष्टपैलूत्व सिद्ध करण्यात कमी पडतोय. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि टीम इंडियाला येत्या काळात त्याची जागा भरुन काढणारा खेळाडूला शोधावे लागणार आहे.
मर्यादित षटकांच्या सामन्यात नेतृत्व करताना रोहित शर्माला या विषयाची चिंता असेल. देशांतर्गत विजय हजारे स्पर्धेच्या मैदानातून रोहितचं हे टेन्शन दूर करण्याचा उपाय मिळाला आहे. आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाइट रायडर्सकडून लक्षवेधी कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवलेला व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer) विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत दमदार कामगिरी करत आहे. मध्यप्रदेशकडून खेळणाऱ्या या खेळाडूनं शनिवारी उत्तराखंड विरुद्धच्या सामन्यात (Madhya Pradesh vs Uttarakhand) अर्धशतकासह दोन विकेट घेऊन आपल्यातील अष्टपैलूत्व सिद्ध केले आहे. स्पर्धेतील अखेरच्या 2 सामन्यात व्यंकटेश अय्यरनं एक शतक आणि एका अर्धशतकाच्या मदतीने 183 धावा आणि 5 विकेट घेतल्या आहेत. आपल्या या खेळीतून त्याने आगामी काळात हार्दिक पांड्यासाठी योग्य पर्याय असल्याचे संकेतच दिले आहे.
टीम इंडियाचा अष्टपैलू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे त्रस्त असून तो भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी फिटनेसवर भर देत आहे. त्याच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर (India vs South Africa) व्यंकटेश अय्यरला वनडे संघात स्थान मिळू शकते. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघात आणखी एका नव्या चेहऱ्याला संधी मिळाली, तर नवल वाटणार नाही.
केकेआरने 8 कोटींमध्ये केलं आहे रिटेन
केकेआर (KKR) ने आयपीएल 2022 (IPL 2022) च्या हंगामासाठी होणाऱ्या मेगा लिलावापूर्वी व्यंकटेश अय्यरला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी फ्रेंचायझींनी 8 कोटी रुपये मोजले आहेत. गत हंगामात पहिल्यांदा आयपीएल स्पर्धेत खेळताना व्यंकटेश अय्यरने 10 सामन्यात 370 धावा केल्या होत्या. त्याच्या कामगिरीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने फायनलपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर व्यंकटेश अय्यरला न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत संघात स्थान मिळाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.