Vinesh Phogat: विनेश फोगाटच्या अपात्रतेमागे मोदी सरकारचा हात, कुटुंबियांचा धक्कादायक आरोप! क्रिडा विश्वात खळबळ

vinesh phogat disqualified : सपोर्टिंग स्टाफने विनेशला दिशाभूल केल्यामुळे तिच्या विरोधात मोठा निर्णय घेतला गेला आहे. राजपाल भाटी यांनी असेही म्हटले की, विनेशने भाजप नेते बृजभूषण सिंहविरोधात आवाज उठवला होता आणि त्याचाच बदला घेण्यासाठी हा षडयंत्र रचला गेला आहे.
vinesh phogat
vinesh phogatesakal
Updated on

पॅरिस ऑलंपिकसाठी विनेश फोगाटच्या अपात्रतेवर तिच्या परिवाराने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परिवाराच्या मते, केंद्र सरकार आणि फेडरेशनने मिळून मोठी कट रचला आहे. विनेश फोगाटचे सासरे राजपाल भाटी यांनी धक्कादायक आरोप केला. ते एका वृत्तवाहिनीसोबत बोलत होते. विनेश फोगाटला ऑलंपिक फायनलमध्ये अपात्र घोषीत केल्यामुळे देशभरात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

विनेश फोगाटचे सासरे राजपाल भाटी एबीपी हिंदी सोबत बोलताना म्हणाले, विनेशने ऑलंपिकपूर्वीच सांगितले होते की तिच्या विरोधात षडयंत्र होईल. त्यांच्या म्हणण्यानुसार, तिच्या विरोधातील निर्णय पूर्णपणे कटाचा भाग आहे आणि यामध्ये सरकार व फेडरेशनचा हात आहे. त्यांनी हेही सांगितले की, विनेशचे वजन वाढल्यामुळे तिच्या कोच आणि सपोर्टिंग स्टाफचा हात आहे.

विनेशच्या पराभवात सरकार आणि फेडरेशनचा हात

सपोर्टिंग स्टाफने विनेशला दिशाभूल केल्यामुळे तिच्या विरोधात मोठा निर्णय घेतला गेला आहे. राजपाल भाटी यांनी असेही म्हटले की, विनेशने भाजप नेते बृजभूषण सिंहविरोधात आवाज उठवला होता आणि त्याचाच बदला घेण्यासाठी हा षडयंत्र रचला गेला आहे. फेडरेशन आणि सरकार पूर्णपणे या कटामध्ये सामील असल्याचे त्यांनी सांगितले.

vinesh phogat
PM Modi on Vinesh Phogat: विनेश तू चॅम्पियन आहेस! मला माहीत आहे तू.. पदक गमावल्यावर PM मोदींनी केलं सांत्वन

महावीर फोगाट काय म्हणाले?

विनेश फोगाटचे काका महावीर फोगाट म्हणाले, विनेश अपात्र झाल्यामुळे आम्हाला दु:ख झाले. मात्र ती पुन्हा मेहनत करेल आणि देशासाठी मेडल आणेल.

आणखी एक नातेवाईक मनोज कुमार म्हणाले, आम्ही तर गोल्ड मेडलसाठी आशा ठेवून होता. वजन वाढल्याचे प्रकरण आम्हाला माहित नाही. मात्र आधीची जी मॅच झाली. त्याचे काहीतरी व्हायला पाहिजे. सर्व देशात नाराजी आहे. 

IOA चे स्पष्टीकरण

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) ने एक निवेदन जारी करून विनेशच्या डिसक्वालिफिकेशनची पुष्टी केली. निवेदनात म्हटले आहे, "भारतीय संघाच्या खेदाने सांगावे लागत आहे की विनेश फोगाट महिलांच्या कुस्ती 50 किलोग्राम वर्गातून अपात्र करण्यात आले. रात्रभर प्रयत्न करूनही, तिचे वजन सकाळी काही ग्रॅम जास्त निघाले. या वेळेस अधिक टिप्पणी केली जाणार नाही. विनेशच्या प्रायव्हसीचा आदर करावा आणि भारतीय संघाला सध्याच्या स्पर्धांवर लक्ष केंद्रित करू द्यावे."

नरेंद्र मोदींचे विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनेश फोगाटला धीर देत म्हटले, "विनेश, तुम्ही विजेत्यांमध्ये विजेते आहात! तुम्ही भारताचा अभिमान आणि प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणा आहात. आजचा धक्का त्रासदायक आहे, परंतु मला खात्री आहे की तुम्ही हे आव्हान पेलून पुन्हा जोरात परत येणार. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत."

विनेश फोगाट विरोधातील या आरोपांमुळे क्रीडा विश्वात मोठी खळबळ उडाली आहे आणि या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी होत आहे.

vinesh phogat
Paris Olympic 2024 Vinesh Phogat: शाब्बास विनेश फोगाट! टोकियोतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला केले चीतपट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.